शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पालकांची संभ्रमावस्था

By admin | Updated: July 19, 2015 00:57 IST

संजय कुलकर्णी , जालना शासनाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांना,

संजय कुलकर्णी , जालनाशासनाच्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आधार क्रमांक लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विविध शाळांकडून विद्यार्थ्यांना, पालकांना आधार कार्ड किंवा त्याची पावती आणून देण्याविषयी वारंवार सांगितले जात आहे. परंतु आधार कार्ड काढण्याच्या निश्चित ठिकाणांपासून बहुतांश पालक अनभिज्ञ असून प्रशासनानेही विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शिबीर घेतलेले नाही किंवा त्यासाठीची व्यवस्था केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसंबंधी पालक संभ्रमात आहेत.विद्यार्थ्यांच्या आधारकार्डसंबंधी शासनाने सर्व शाळांना सक्तीच्या सुचना दिलेल्या आहेत. ठिकठिकाणी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना व वेळप्रसंगी पालकांना शाळेत बोलावून विद्यार्थ्याचे आधारकार्ड किंवा पावती द्यावी, अशी सूचना केली जात आहे. परंतु आधारकार्ड कोठे काढायचे? याविषयीची निश्चित माहिती पालकांना मिळत नाही. त्यामुळे पालकांमध्ये याविषयीचा संभ्रम निर्माण झालेला आहे. काही विद्यार्थ्यांचे यापूर्वी आधारकार्डची नोंदणी केल्यानंतर त्यांना पोचपावती मिळाली नाही. या पोच पावतीच्या क्रमांकाशिवाय कोणत्याही नेट कॅफेवर संबंधित विद्यार्थ्याचे आधारकार्ड काढता येत नाही. शिवाय नवीन आधारकार्डही काढता येत नाही. दरम्यान, काही खाजगी कॅफेंवर आधारकार्डसाठी जादा रक्कम घेतली जात असल्याचेही पालकांमधून सांगण्यात आले.याबाबत पालक गोविंद इंगळे म्हणाले, विद्यार्थ्यांना आधार क्रमांक मिळवून देण्याची जबाबदारी शासनाने संबंधित शाळा, संस्थांवर निश्चित केलेली आहे. मात्र याबाबत शाळांकडून पालकांनाच बाहेरून कार्ड काढून आणा, अशी वारंवार सूचना केली जात आहे.४अंकुर बालक मंदिराच्या संचालिका अलका गव्हाणे म्हणाल्या, जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ज्या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आहेत, त्यांची यादी करण्याचे सांगितले आहे. परंतु आधारकार्ड काढण्याची व्यवस्था करून दिलेली नाही. अनुदानित शाळांकडेच अधिक लक्ष दिले जाते, असा आरोप गव्हाणे यांनी केला.४सरस्वती भुवनचे मुख्याध्यापक रमेश वळसे म्हणाले, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्याच्या सूचना शिक्षकांकडून पालकांना केल्या जातात. परंतु पालकांची अडचण लक्षात घेता, सर्व मुख्याध्यापकांनी काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाकडे आधारकार्ड काढून देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार लवकरच शाळानिहाय ही व्यवस्था होणार असल्याचे आम्हाला कळाले आहे.जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या एकूण ३ लाख २६ हजार विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढलेले आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक लिंक करण्यासाठी विविध शाळांना अडचणी येत आहेत. त्यामुळे आधारकार्ड काढण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्हाधिकारी नायक यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ११ यंत्र देण्यास संमती दर्शविली असून यामध्ये जालना शहरात व भोकरदन तालुक्यात प्रत्येकी दोन तसेच अन्य तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका यंत्राचा समावेश राहणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन सूसर यांनी दिली. ज्या पालकांना विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड काढण्यासंबंधी काही शंका असल्यास त्यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी सूसर यांनी केले आहे.शिक्षण विभागाने २०११ मध्ये राबविलेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेअंतर्गत काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या बोगस आढळून आली होती. विद्यार्थी व पालक यांना आमिष दाखवून एका शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत पळविणे, एकाच मुलाचे नाव अनेक शाळांच्या पटावर असणे इत्यादी प्रकार आढळून आले होते. पटपडताळणीत आढळून आलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने संचमान्यतेमध्ये काही सुचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आधार क्रमांक मिळवून देणे ही संबंधित शाळेची/संस्थेची जबाबदारी असेल, असे नमूद केलेले आहे.