शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाचा गोंधळ; विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ

By admin | Updated: November 17, 2016 00:57 IST

लातूर अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले.

बाळासाहेब जाधव  लातूरअर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिककडून अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. यामुळे लातूर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. परंतु, विद्यापीठ कर्मचाऱ्यांमधील समन्वयाअभावी अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच गहाळ झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ या उक्तीनुसार अर्धवट शिक्षण राहिलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरवून शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून गेल्या अनेक दिवसांपासून केला जात आहे. यामध्ये बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. एम.एस्सी., पत्रकारिता पदवी तसेच अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम लातूर शहरातील ६ केंद्रांवरून तसेच ग्रामीण भागातील केंद्रांवरून चालविले जातात. यामुळे अर्धवट शिक्षण झालेले व डी.एड्., बी.एड्.चे विद्यार्थी उर्वरित शिक्षणासाठी या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. परंतु, यावर्षी मात्र विद्यापीठ, परीक्षा नियंत्रण विभाग व उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविणारी खाजगी कंपनी यांच्यामध्ये समन्वय नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील १५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये शिवाजी महाविद्यालयातील केंद्रावर बी.ए. तृतीय वर्षाची परीक्षा दिलेल्या ज्ञानेश्वर साळुंके याने परीक्षा देऊनही त्याची विद्यापीठाने गैरहजेरी दाखविली. तर शाहू महाविद्यालयातील प्रशांत सोपानराव मोरतळे या विद्यार्थ्याने बी.लिब अभ्यासक्रमाअंतर्गत लायब्ररी कॅटलॉगिंग या विषयाची परीक्षा दिली. मात्र आॅनलाईन निकालामध्ये त्यालाही गैरहजर दाखविण्यात आले आहे. परीक्षा देऊनही उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. तसेच या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही वाया गेले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी कागदोपत्री पाठपुरावा करूनही विद्यापीठाकडून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने लातूर जिल्ह्यातील १५ विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.