शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

महापालिका सदस्यांचा अतिक्रमणावर गोंधळ !

By admin | Updated: January 18, 2015 00:30 IST

लातूर : महापालिकेच्या विविध १८ विषयांवर आयोजित सर्वसाधारण सभेत विषय बाजूला सारून सत्ताधारी पक्षातील सदस्यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही अतिक्रमण हटाव मोहिमेवर

लातूर : महापालिकेच्या विविध १८ विषयांवर आयोजित सर्वसाधारण सभेत विषय बाजूला सारून सत्ताधारी पक्षातील सदस्यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही अतिक्रमण हटाव मोहिमेवर बराचवेळ खल घातला. सभेच्या प्रारंभीपासूनच बहुतांश नगरसेवक प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर आक्रमक झाल्याने १५ मिनिटांसाठी सभा तहकूब करावी लागली. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या सभेत नेहमीप्रमाणे ‘ठरलेल्या’ सदस्यांनी गोंधळ घातला. दुपारी ३.३० वाजेनंतर मुख्य विषयाला सुरुवात झाल्याने महिला सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय, महिला सभापतींना प्रशासनात स्थान मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करून त्यांनी महापौरांच्या टेबलावर राजीनामा ठेवला. यावेळी एमजीपीकडून पाणीपुरवठा योजना वर्ग करून घेण्यासाठीही चर्चा झाली. नगरसेवक केशरबाई महापुरे यांनी मनपाकडे यंत्रणा असताना चालढकल कशासाठी? असा सवाल केला. डॉ. रुपाली सोळुंके यांनी महिलांना सन्मान दिला जात नसल्याचा आरोप केला.महापौर अख्तर शेख व चंद्रकांत चिकटे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर अर्धा तास सभा तहकूब झाली. ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यावर महापौरांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले.४ एप्रिल २०१३ रोजी मूलभूत पायाभूत सुविधांसाठी २० कोटी रुपये मंजूर झाले होते. यातील केवळ ३ कोटी ९८ लाखांची कामे सुरू आहेत. उर्वरित १६ कोटी रुपये खर्चास मनपा अपयशी ठरल्याचा आरोप करून लक्ष्मण कांबळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. नाट्यगृहासाठी जागा नसताना ८ कोटी का ठेवण्यात आले. शिवाय, अन्य पैशांचा हिशेब द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. यावर आयुक्तांनी खुलासा दिला. महिला व बालकल्याण सभापती रेणुका कडने, उपसभापती शमाबी मोमीन, शिक्षण सभापती पूजा पंचाक्षरी यांनी महिला सभापतींना विश्वासात घेतले जात नाही. आम्ही सांगितलेले काम होत नाही. पदाचा उपयोग होत नसेल, तर पदावर राहण्याची गरज नाही, असे म्हणत लेखी राजीनामे महापौरांकडे दिले. यानंतर महापौरांनी त्यांच्या अडचणी समजून घेत दूर केले जातील, असे म्हटल्यावर राजीनामा परत घेतला. सर्वसाधारण सभेत मागील इतिवृत्त वाचून कायम करण्यावरच चार तास वादंग झाले. नागरिकांना दुपारी ३.३० ते ५.३० यावेळेत प्रशासन व पदाधिकारी नागरिकांसाठी वेळ देतील. महापालिकेची मुद्रा निश्चित करण्यावर बराच खल झाला. विक्रांत गोजमगुंडे यांनी समिती स्थापन करण्याबाबत मत मांडले. त्यानंतर महापौरांनी या संदर्भात समिती गठित केली. दीपक सूळ यांनी सरसकट अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. चंद्रकांत चिकटे म्हणाले. सिटी बस व्यवहारातील अपहार बाजूला सारण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरू आहे. ४राजा मणियार म्हणाले, प्रशासन हे जातीयवादी आहे. धनदांडग्या लोकांचे अतिक्रमण हटविले जात नाही. दोन दिवसांत खोरी गल्लीतील उर्वरित अतिक्रमण हटविले नाही, तर महापौर व आयुक्तांना बसू देणार नाही. ४मकरंद सावे म्हणाले, मार्किंग नाही. नकाशे नाहीत. प्रशासन अतिक्रमण कुठल्या आधारावर हटवीत आहे. चाँदपाशा घावटी म्हणाले, नियमबाह्य पद्धतीने कारवाई सुरू आहे. गुत्तेदारांचे हित जोपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शैलेश स्वामी यांनी चर्चेत सहभाग घेतला.