शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगरात मतदार याद्यांतील घोळामुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील २१ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार (दि.१५) शांततेत मतदान झाले. या परिसरात बहुतांश ठिकाणी मतदार याद्यांत ...

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील २१ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार (दि.१५) शांततेत मतदान झाले. या परिसरात बहुतांश ठिकाणी मतदार याद्यांत झालेल्या घोळामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला, तर पंढरपुरातील मयत व्यक्तीच्या नावावर मतदान करण्याचा प्रयत्न केंद्राध्यक्षांनी हाणून पाडला.

औद्योगिक क्षेत्रातील श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, पंढरपूर, अंबेलोहळ, नारायणपूर या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी व भाजपने ताकद लावली आहे. या निवडणुकीत सरपंचपदाचे घोषित करण्यात आलेले आरक्षण शासनाच्या वतीने रद्द करण्यात आल्याने सरपंचपदाचे दावेदार असलेल्या मातब्बर उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. निवडणूक निकालानंतर सरपंचपद वेगळ्याच प्रवर्गासाठी निघाल्यास सत्तेची उब मिळणार नसल्याने मातब्बर उमेदवारांनी पॅनलचा खर्च करण्यास नकार दिल्याने अनेकांना स्वखर्चाने रणांगणात उतरावे लागले. शुक्रवारी सकाळपासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ठिकठिकाणच्या केंद्रासमोर गर्दी केली होती. उमेदवाराकडून मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याने अनेकांनी सकाळीच मतदान केले. दुपारनंतर मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसून आली नाही. सायंकाळी ४ वाजेनंतर कंपनीतून सुटी झाल्यानंतर कामगार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मतदारांची ऑक्सिमीटर व थर्मल गनने तपासणी करण्यात आली. यानंतर सॅनिटायझर लावल्यानंतर मतदारांना केंद्रात प्रवेश देण्यात आला.

ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांत उत्साह

ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक, तसेच दिव्यांग मतदारांनी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मतदान करण्यासाठी केंद्रावर हजेरी लावली होती. मतदान केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांनीही दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना रांगेत उभे न करता त्यांना तात्काळ मतदानासाठी केंद्रात सोडले. पवित्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ज्येष्ठ मतदारांत उत्साह होता.

याद्यांतील घोळामुळे मतदार नाराज

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रांजणगाव, वाळूज, जोगेश्वरी, पंढरपूर आदी ठिकाणी एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेग-वेगळ्या प्रभागांत गेल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. अनेक मतदारांना पोलिंग चीट न मिळाल्याने त्यांना आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे हे पाहण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. मतदार याद्यांत झालेल्या घोळामुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त करून याचे खापर प्रशासनावर फोडले.

पंढरपुरात मयत मतदाराच्या नावाने मतदानाचा प्रयत्न

पंढरपूर येथील जुन्या जि.प. शाळेत भास्कर जयाजी ढोले (६२) या मयत मतदाराच्या नावे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी एक जण मतदान केंद्रावर आला होता. मात्र, केंद्राध्यक्ष अमोल वैराग यांना संशय आल्याने त्यांनी त्या मतदारास रोखून ठेवत केंद्रावर बसवून ठेवले. यानंतर दोन महिला बनावट मतदान ओळखपत्र घेऊन मतदान करण्यासाठी आल्या होत्या. या महिलांनाही मतदान केंद्रावर रोखल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. या प्रकाराची माहिती मिळताच सहा. पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, सहा. पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोनि. मधुकर सावंत यांनी या केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. मात्र, मतदान केंद्राध्यक्ष वैराग यांनी तक्रार न दिल्यामुळे या बोगस मतदारांवर पोलीस प्रशासनाला कारवाई करता आली नाही.

मतदान केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

वाळूज व एमआयडीसी हद्दीतील २१ ग्रामपंचायतींसाठी १३८ बुथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जोगेश्वरी, रांजणगाव व पंढरपुरात मतदान केंद्रात मतदारांना रस्त्यात रोखणाऱ्या उमेदवार व पोलिंग एजंटला पोलिसांनी तंबी देत केंद्रात येण्यास मज्जाव केल्याने या केंद्रावर शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत व वाळूजचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

--------------------------------