शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत केंद्रीय वक्फ समितीसमोर गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:19 IST

औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे भाडेकरार नियम २०१४ ची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या सहा सदस्यांच्या समितीने शनिवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात बैठकीला सुरुवात केली. बैठकीत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दुपारी १ वाजता धुडगूस घातला. समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी सदस्यांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या. घाबरलेल्या अवस्थेत समितीला पळ काढावा लागला.

ठळक मुद्दे एमआयएम : सदस्यांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या

औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे भाडेकरार नियम २०१४ ची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या सहा सदस्यांच्या समितीने शनिवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात बैठकीला सुरुवात केली. बैठकीत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दुपारी १ वाजता धुडगूस घातला. समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी सदस्यांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या. घाबरलेल्या अवस्थेत समितीला पळ काढावा लागला.केंद्र सरकारने वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे भाडेकरार नियम २०१४ तयार केला आहे. याची अंमलबजावणी व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या अध्यक्षतेखाली आर. एस. सक्सेना, अ‍ॅड. सय्यद शाहीद हुसेन रझवी, अ‍ॅड. टी. ओ. नौशाद, डॉ. अनिलकुमार गुप्ता, सदस्य सचिव बी. एम. जमाल या सहा सदस्यांची समिती गठीत केली आहे. ही समिती प्रत्येक राज्यांत जाऊन मुतवली आणि वक्फ मालमत्ताधारक यांच्याशी चर्चा करून भाडेकरार नियमातील अडचणी व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना याबद्दल मत विचारात घेत आहे. न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली ही समिती दोनदिवसीय दौऱ्यावर औरंगाबादेत आली आहे. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात समितीने शहरातील मुतवली व वक्फ बोर्डाच्या मालमत्ताधारकांना बोलावले होते. यासाठी ५० ते ६० मुतवलींसह मालमत्ताधारक उपस्थित होते.आमदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्ते समितीला भेटण्यासाठी आले. आ. जलील यांनी राज्यातील वक्फ मालमत्तांची माहिती दिली. काही मालमत्तांची परस्पर विक्री करण्यात आली. काही मालमत्ता इतर समाजातील नागरिकांना देण्यात आल्यामुळे मुस्लिम समाजातील होतकरू तरुणांना उद्योग व व्यवसायासाठी जागा मिळत नाही. समितीतील एका सदस्याने भाडेकराराच्या मुद्द्यावर बोला, इतर मुद्यांवर बोलू नका, असे सांगताच कार्यकर्ते चिडले. कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ सुरू केला. त्यांनी सदस्यांच्या दिशेने खुर्च्या भिरकावल्या. न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्यासह सदस्यांना आ.जलील यांनी हॉलमधील एका कोपºयात नेले. तेथून सदस्यांना वाहनातून पाठवून दिले.

टॅग्स :GovernmentसरकारPoliticsराजकारण