शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी आणि खर्चाच्या आकड्यांमध्ये घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:03 IST

औरंगाबाद : शहरातील नवबौद्ध घटकासाठी नळ जोडणी व वैयक्तिक स्वच्छतागृह योजना शासन अनुदानातून महापालिकेतर्फे राबविण्यात आली आहे. या योजनेत ...

औरंगाबाद : शहरातील नवबौद्ध घटकासाठी नळ जोडणी व वैयक्तिक स्वच्छतागृह योजना शासन अनुदानातून महापालिकेतर्फे राबविण्यात आली आहे. या योजनेत ३ कोटी ३४ लाख ३ हजार ९८६ रुपये खर्च करण्यात आले. महापालिकेने मात्र लाभार्थी व खर्चाचे वेगवेगळे आकडे शासनाला कळविले आहेत. त्यामुळे यासंदर्भात त्वरित खुलासा करावा, असे पत्र पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महापालिकेला पाठविले आहे.

राज्य शासनाने नवबौद्धांसाठी मोफत नळ जोडणी व स्वच्छतागृह योजना काही वर्षांपूर्वी राबविली होती. त्यासाठी महापालिकेमार्फत लाभार्थींची निवड करण्यात आली. महापालिकेने भीमनगर, भावसिंगपुरा, निसर्ग कॉलनीसह अन्य भागात नळ कनेक्‍शन दिले. त्यासाठी ३ कोटी ३४ लाख ३ हजार ९८६ रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र, अन्य एका पत्रात दोन कोटी ६८ लाख ९५ हजार ८६४ रुपये खर्च दाखविण्यात आला. कोणता आकडा खरा याविषयी खुलासा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महापालिकेला केल्या आहेत.

---------

लाभार्थींच्या आकड्यातही तफावत

खर्चाच्या आकड्यासोबत लाभार्थींच्या आकड्यातही तफावत आहे. एका पत्रात ९ हजार २३० जणांना लाभ देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर दुसऱ्या पत्रात लाभार्थींची संख्या ५ हजार २३० एवढी दाखविण्यात आली आहे. या मुद्द्यावर देखील खुलासा करण्यात यावा, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

----------

पाईपलाईनची केली कामे

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने अन्य एका पत्रात भीमनगर, भावसिंगपुरा, निसर्ग कॉलनीत टाकण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामावर आक्षेप घेतला आहे. या योजनेत नळ जोडण्या देणे अपेक्षित होते. पाईपलाईनची कामे अन्य निधीतून किंवा नगर विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून करणे गरजेचे होते, असे पत्र कक्ष अधिकाऱ्याने महापालिकेला दिले आहे. त्यामुळे महापालिका संकटात सापडण्याची शक्यता आहे.