शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : परगावावरून शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या कोरोना रुग्णांना आजाराने वेदना होत आहेत, पण त्यांच्या मदतीसाठी बाहेर सदैव ...

औरंगाबाद : परगावावरून शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या कोरोना रुग्णांना आजाराने वेदना होत आहेत, पण त्यांच्या मदतीसाठी बाहेर सदैव हजर असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढला. पहिले शहरात व आता ग्रामीण भागाला कोरोनाने विळख्यात घेतले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनच नव्हे, तर परजिल्ह्यातून कोरोना रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत. त्या रुग्णासोबत त्याचे दोन ते तीन नातेवाईकही असतात. कोरोना रुग्ण असल्याने रुग्णालयामध्ये त्याच्या नातेवाईकांना मुक्कामी राहण्यास मनाई आहे.

सर्वसामान्य नागरिकांना लॉजिंग-बोर्डिंगमध्ये राहणे परवडत नाही. तसेही शहरातील लॉजिंग बंद केलेली आहेत. यामुळे रात्री मुक्काम कुठे करावा, असा यक्षप्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांना पडत आहे. आमच्या प्रतिनिधीने घाटी परिसरात पाहणी केली असता, मेडिसिनच्या नवीन इमारतीबाहेर एक पत्र्याचे शेड आहे. तिथे कोरोना रुग्णांचे नातेवाईक राहत आहेत. तिथेच उघड्‌यावर झोपत आहेत. एवढेच नव्हे, तर शहरातील खासगी रुग्णालयांबाहेर हीच परिस्थिती आहे. घाटीत शेड तरी आहे, खासगी रुग्णालयांबाहेर शेडही नाही. अनेक जण झाडाच्या सावलीत बसून दिवस - रात्र काढत आहेत.

यात महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. उघड्यावर झोपायचे कसे? स्वच्छतागृह नाही, अंघोळीची सोय नाही, कोरोनाबाधित रुग्णासमवेत आल्याने शहरातील नातेवाईकांकडेही जाता येत नाही. एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

चौकट

रुग्णालयापेक्षा बाहेर जगणे कठीण

रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णाची देखभाल करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स असतात. मात्र, ५ एप्रिलपासून बाहेर आम्ही रस्त्यावर बसून कसे दिवस काढतोय, ते आम्हालाच माहीत. बाहेर जगणे कठीण झाले आहे. कारण, राहण्यासाठी सोय नाही.

- समाधान करघे, रेलगाव

---

महिलांना अधिक अडचणी

माझे पती १ एप्रिलपासून रुग्णालयात ॲडमिट आहेत. आम्हाला येथे पत्र्याच्या शेडखाली राहावे लागते. येथे उघड्यावरच झोपावे लागते. अंघोळीची, स्वच्छतागृहाची काहीच सोय नाही. हीच मोठी अडचण ठरत आहे.

- संगीता भोकरे

कन्नड

--

जीव मुठीत घेऊन जगतो

मागील १८ दिवसांपासून आम्ही घाटीत पत्र्याच्या शेडखाली दिवस काढत आहोत. निरोप आला की, इंजेक्शन, औषधी आणण्यासाठी जावे लागते. ३० रुपयात जेवण मिळते, पण येथे अस्वच्छता आहे. सर्व कोरोना रुग्णांचे नातेवाईक आजुबाजूला असल्याने संसर्ग पसरू शकतो. यामुळे सर्वजण जीव मुठीत घेऊन जगत आहोत.

- स्वाती शहाणे

गंगापूर

चौकट

नातेवाईकांकडे जाता येत नाही

आमच्या घरातील व्यक्ती कोरोनाबाधित आली. खासगी रुग्णालयात दाखल केले. शहरात आमचे बरेच नातेवाईक आहेत. पण कोरोना रुग्ण सोबत असल्याने आम्हाला त्यांच्याकडे जाता येत नाही. नातेवाईकही फोनवरच चौकशी करण्यात धन्यता मानत आहेत. काही नातेवाईकांनी तर मागील १० दिवसांपासून आम्हाला वाळीतच टाकल्यासारखेच वाटत आहे, अशा भावना कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या.

३) नातेवाईकांकडे जाता येत नाही अन् दुकानात काही मिळत नाही (बाॅक्स)