जालना : आपत्कालीन वेळेस इमारतीचे सिमेंट खांब अथवा लोखंडाचा अडथळा येतो. त्यामुळे आग विझविण्यासाठी अडचण येत होते. यातून मार्ग काढण्यासाठी अग्निशमन विभागाला काँक्रीट कटर यंत्र देण्यात आले आहे. हे यंत्र विजेविना चालणार आहे. मंगळवारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.एखाद्या ठिकाणी आग लागली किंवा इतर आपत्कालीन घटना घडली तर त्याठिकाणी पोहोचण्यासाठी अनंत अडचणींचा सामना अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावा लागत असे. अनेकवेळा लोखंडी, स्टील व काँक्रीट खांब आडवे येत होते. कर्मचाऱ्यांना जोखीम पत्करावी लागत होती. मंगळवारी जर्मनीहून काँक्रीट कटर यंत्र मागविण्यात आले आहे. मुंबई येथील तज्ज्ञ सागर केवुडकर यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन प्रात्यक्षिके दाखवली. यावेळी अधिकारी डी.एम.जाधव, जी. बी. काटकर, सूरज काळे, उत्तमसिंग राठोड, सादिक अली, अब्दुल बासीत, सत्तार पठाण, शेख रशीद, संजय हिरे, आर.के.बनसोडे आदींची उपस्थिती होती.
अग्निशमक दलाला मिळाले काँक्रीट कटर यंत्र
By admin | Updated: November 10, 2016 00:12 IST