शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

‘एक विचार, एक मंच’चा परिसर फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:34 IST

एक विचार, एक मंच’ हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार वर्धापन दिनाचे आकर्षण ठरले. एक मंचचा परिसर दुपारपासूनच आंबेडकरी समुदायाने दणाणून गेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘एक विचार, एक मंच’ हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार वर्धापन दिनाचे आकर्षण ठरले. एक मंचचा परिसर दुपारपासूनच आंबेडकरी समुदायाने दणाणून गेला होता.गटा-तटांमध्ये विखुरलेल्या आंबेडकरी समाजामध्ये कोरेगाव-भीमा येथील घटनेनंतर ऐक्याची भावना अधिक तीव्र झाली आहे. हे रविवारी ‘एक मंच’ला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादावरून स्पष्ट झाले. यासंदर्भात औरंगाबादेतील युवकांनी विद्यापीठ नामविस्तारदिनी एकच व्यासपीठ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज गेट परिसरात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे व्यासपीठ सोडले, तर अन्य एकाही दलित पक्ष-संघटनेचे स्टेज दिसले नाही.राज्याच्या कानाकोप-यातून लाखो आंबेडकरी अनुयायी विद्यापीठ गेट परिसरात आले होते. गेटसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व शहीद स्तंभास अभिवादन करण्यासाठी सकाळपासून रीघ लागली होती. विधि महाविद्यालयाकडून येणा-या रस्त्यावर तसेच आंबेडकर कला महाविद्यालयाचे मैदान व रस्त्यावर भीम-बुद्ध गीतांच्या कॅसेट, पुस्तके, फोटोंची दुकाने थाटलेली होती. भीमशक्तीच्या वतीने महाभोजनदान मंडप होता. हजारो आंबेडकरी अनुयायांनी सकाळपासूनच भोजनाचा आस्वाद घेतला. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी पहिल्यांदाच विद्यापीठ गेटकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी सकाळपासून वाहनांसाठी बंद केले होते. समता सैनिक दलाच्या उत्कृष्ट संचलन व बंदोबस्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एक मंचावर दुपारपासून विविध गायक कलावंतांनी प्रबोधनात्मक गीते सादर केली. या मंचच्या स्वयंसेवकांनी उपस्थित जनसमुदायावर शिस्तबद्धपणे नियंत्रण मिळवले.