शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

जळकोट तालुक्यातील मशागतीची कामे पूर्ण

By admin | Updated: June 16, 2014 01:14 IST

एम़जी़मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील बळीराजाने आपल्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण केली असून, तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

एम़जी़मोमीन , जळकोटजळकोट तालुक्यातील बळीराजाने आपल्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण केली असून, तालुक्यातील शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात एकूण शेतीचे क्षेत्रफळ ३४ हजार हेक्टर्स असून, त्यापैकी २५ हजार हेक्टर्स जमीन पेरणीयोग्य आहे. जळकोट तालुका हा खरीपाचा म्हणून ओळखला जातो. या हंगामात सोयाबीन, ज्वारी, मूग, तूर आदी पेरा करण्यात येतो. यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीनचा केला जातो. तालुक्यातील शेती ही सुपिक असल्याने ८० ते ९० टक्के शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बळीराजाला पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा लागली आहे. शेतातील सर्व मशागतीची कामे पूर्ण करून आता आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी कृषी दुकानांवर गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. जळकोट तालुक्यातील खताच्या कोट्यामध्ये १०: २६:२६ तीनशे टन, २४:२४:०० - २३८ टन, २०:२०:२० - २९० टन, १८:४६:०० - २९५ टन, १५:१५:१५- ११८ टन, एसएसपी १५७ टन, युरिया ३६५ टन, १२:३२:१६ - ५४ टन, एमओपी- ४० टन असा एकूण १८५७ टन खत शिल्लक असल्याची माहिती तालुका कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.शेतातील सर्व मशागतीची कामे पूर्ण करून आता आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी कृषी दुकानांवर गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. जळकोट तालुक्यातील खताच्या कोट्यामध्ये १०: २६:२६ तीनशे टन, २४:२४:०० - २३८ टन, २०:२०:२० - २९० टन, १८:४६:०० - २९५ टन, १५:१५:१५- ११८ टन, एसएसपी १५७ टन, युरिया ३६५ टन, १२:३२:१६ - ५४ टन, एमओपी- ४० टन असा एकूण १८५७ टन खत शिल्लक असल्याची माहिती तालुका कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. गतवर्षीपेक्षा यावर्षी बी-बियाणे व खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. शेतकरी गारपिटीच्या तडाख्यात अडकला असताना या भाववाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून, बी-बियाणांसाठी पैशाची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची कसरत होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून प्रत्येक खते व बी-बियाणांची रक्कम जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते दुकानदारांकडून खरेदी करताना पावती घ्यावी व बियाणांच्या पिशवीवरील देयके पाहून रक्कम द्यावी. कुठलाही दुकानदार खते-बियाणासाठी आगाऊ पैशाची मागणी करीत असल्यास कृषी विभाग किंवा कृषी अधिकारी बालाजी किरवले यांच्याशी संपर्क साधावा.बियाणे व खताची उपलब्धता़़़खताच्या एका पोत्याची किंमत २८९ रुपये, डीएपी ११८०, ११९० रुपये, २०:२०:० आरसीएफ ८०९ रुपये, २०:२०:१३-८५३, ८८९ रुपये, १०:२६:२६- ११०९, ११०० रुपये, एसएसपी पॉवर ३५० रुपये, दाणेदार ३५९ रुपये, २४:२४:०- ९३९ रुपये, एएमएम ४९०, एमओपी ८४० रुपये, १२:३२:१६-११२७ रुपये या प्रमाणात किंमती असल्याचेही सांगण्यात आले. महाबीज सोयाबीन २३८५ रुपये, ईगल एक्सलर २३७५ रुपये, ईगल एस ३३५-२७२०, ईगल बेसीफ-२५६५ रुपये, कृषीधन-२५०० रुपये, ओमकार-२५ किलो-२६२५ या दराप्रमाणे बियाणे बाजारात उपलब्ध असल्याची माहिती दिली.