शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ५० किमीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 00:22 IST

जालना : शहरातील निजामकालीन अंतर्गत जलवाहिनी बदलून त्याजागी नवीन जलवाहिनी अंथरण्यात येत आहे

जालना : शहरातील निजामकालीन अंतर्गत जलवाहिनी बदलून त्याजागी नवीन जलवाहिनी अंथरण्यात येत आहे. सुमारे ३९१ किमी जलवाहिनीचे काम होणार असून, त्यापैकी ५० ते ६० कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पुढील दीड वर्षांत पूर्ण होणार आहे. गरजेपुरता आराखडा काढून हे काम करण्यात येत आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिनी निजामकालीन असून जीर्ण झाली आहे. परिणामी दररोज हजारो लिटर पाण्याची गळती होते. जुनी जलवाहिनी बदलून त्याजागी नवीन जलवहिनी अंथरण्याची मागणी होती. शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर नवीन जलवाहिनी अंथरण्यास मान्यता मिळाली. राज्य शासनाच्या योजनेतून सुमारे १२७ कोटींची ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी पहिला हप्ता म्हणून पालिकेला ४८ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, शहरात नऊ झोन आहेत. त्यात ५० ते ६० किमी जलवाहिनी अंथरण्याचे काम झाले आहे. ४ इंच एचडीपी पाईप अंथरण्यात येत आहे. शहरातील शिवनगर, चंदनझिरा, आझाद मैदान, इंदिरानगर, शिवनगर आदी भागात हे काम पूर्ण झाल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंत्यांनी दिली. जलवाहिनीसाठी लागणारे पाईप, व्हॉल्व्ह तसेच इतर साहित्य आले आहे. सर्व्हे क्रमांक ४८८ मध्ये हे पाईप ठेवण्यात आले आहे. ५० किमीचे काम पूर्ण झाले असून, रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर जलवाहिनी अंथरण्याच्या कामास गती येईल असे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले. शहरातील नवीन वसाहतीत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. हे काम झाल्यावर मुख्य रस्त्यावर जलवाहिनी अंथरण्यात येईल.