शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या लोकशाही दिनात तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:13 IST

वाळूज महानगर : सिडकोतर्फे वाळूज महानगरमध्ये आयोजित लोकशाहीत दिनात नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : सिडकोतर्फे वाळूज महानगरमध्ये आयोजित लोकशाहीत दिनात नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. या परिसरातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आदेश मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिले.सिडको प्रशासनातर्फे सोमवारी (दि.१७) सिडकोच्या वाळूज महानगर कार्यालयात मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन घेण्यात आला. सिडको वाळूज महानगरातील पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन, बांधकाम परवानगी, अंंतर्गत रस्ते, गतिरोधक, खुल्या जागा सामाजिक उपक्रमांसाठी देणे, उद्यान, स्टेडियमची उभारणी वेगात करा, भोगवटा प्रमाणपत्रासाठी नियमात बदल करणे, साफ-सफाई, सेवाकर व पाणीपट्टी आॅनलाइन वसूल करा, भाजी मंडई सुरू करणे, तीसगाव चौफुली ते गावापर्यंत रस्ता करा आदी तक्रारी नागरिकांनी केल्या. नारायण हातोळे, दत्तात्रय वरपे, अंजन साळवे, राणूजी जाधव, नागेश कुठारे, विष्णू जाधव, प्रा. भरतसिंग सलामपुरे, नितीन चव्हाण, संतोष धुमाळ, यादव आदींनी तक्रारी केल्या. सिडको वाळूज महानगरात बांधलेले मोठमोठे बंगले रिकामे असून, त्यात रात्री गुन्हेगार आश्रय घेतात.या बंगल्यांमुळे अस्वच्छताही वाढत असल्याचा आरोप करीत बंगल्याचा वापर न करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांनी केली. बकोरिया यांनी समस्या त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिले. या प्रसंगी सिडकोचे वरिष्ठ नियोजनकार एन. व्ही. गोलखंडे, कार्यकारी अभियंता नितीन कढरे, विकास अधिकारी पी. एम. चव्हाण, अतिक्रमण हटावचे गजानन साटोटे, सहायक कार्यकारी अभियंता जी. व्ही. ठाकूर, अभिजित पवार, आर. डी. मोरे, सुवर्णा मोरे, रवींद्र बारस्कर आदींची उपस्थिती होती.या परिसरातील समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याच्या सूचना बकोरिया यांनी दिल्या.बिल्डरांना काळ्या यादीत टाकणारभोगवटा प्रमाणपत्र न घेता परस्पर घराची विक्री करून सुविधा न पुरविणाऱ्या बिल्डरांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश बकोरिया यांनी दिले.