औरंगाबाद : चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ चित्रपटाच्या माध्यमातून विविध प्रसंग आणि संवादाद्वारे मराठा समाजाच्या भावनेस ठेच पोहोचविली असून, शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. त्यांच्यासह राष्ट्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ, मुंबई आणि ‘सैराट’ चित्रपटातील सर्व कलाकारांना भादंविच्या विविध कलमांन्वये कडक शासन करावे, अशी विनंती करणारी तक्रार औरंगाबादेतील फिर्यादी लवकुमार कडुबा जाधव यांनी सत्र न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर २० मे २०१६ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (रेल्वे) यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होणार आहे. फिर्यादी लवकुमार जाधव यांनी चित्रपटातील विविध प्रसंग आणि संवादांचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, या सिनेमाने मराठा समाजाच्या भावनेस ठेच पोहोचविली आहे. आपण मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेलो. परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. म्हणून आपण अॅड. एन. आर. थोरात यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल करीत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
‘सैराट’विरुद्ध न्यायालयात तक्रार
By admin | Updated: May 19, 2016 00:10 IST