शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नवरदेवाविरुद्ध प्रेयसीची बलात्काराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2017 00:58 IST

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून गर्लफे्रंडशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न करण्यासाठी तयार झालेल्या नवरदेवाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून गर्लफे्रंडशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न करण्यासाठी हळद लावून तयार झालेल्या नवरदेवाविरुद्ध सिटीचौक ठाण्यात शुक्रवारी रात्री बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी पसार झाला.कमलेश बाहुबली गंगवाल (रा. सिंधी कॉलनी), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक डी.एस. सिनगारे यांनी सांगितले की, पीडिता ही फाजलपुऱ्यात राहते, तर आरोपी सिंधी कॉलनीत. दोघेही पदवीधर असून, त्यांच्यात महाविद्यालयात शिकत असल्यापासून ओळख आहे. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दोन वर्षांपासून त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपी कमलेशने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केला. दोन वर्षांपासून त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कमलेशच्या घरातील मंडळींनी त्याचे लग्न दुसऱ्याच एका मुलीसोबत निश्चित केले. ही बाब पीडितेला समजल्यानंतर तिने त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला. त्याने घरातील मंडळींना समजावून सांगतो, असे सांगून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, १९ जून रोजी त्याच्या लग्नाची तारीख ठरल्याचे पीडितेला समजले. यामुळे तिने त्याला पुन्हा गाठले आणि लग्नाच्या आमिषाने तू शारीरिक संबंध प्रस्थापित करून विश्वासघात केल्याचा जाब विचारला. तेव्हा तुला काय करायचे ते कर, मी लग्न करणार असल्याचे त्याने तिला स्पष्ट सांगितले. शिवाय त्यास समजावण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या आईलाही त्याने धमकावले. या प्रकरणी १६ जून रोजी रात्री पीडितेने फिर्याद नोंदविली.