शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांसाठी २४ रोजी ‘पवनचक्की’ बनविण्याची स्पर्धा

By admin | Updated: August 3, 2014 01:11 IST

औरंगाबाद : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा

औरंगाबाद : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, या उद्देशातून लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व संडे सायन्स स्कूलच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २४ आॅगस्ट रोजी ‘विंडमिल मेकिंग स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले आहे. डोंगरावर फिरणारी पवनचक्की बहुतांश जणांनी बघितली असेल. अशी पवनचक्की आपणसुद्धा तयार करावी, असा अनेकदा तुमच्या मनात विचार आलेला असेल. याच तुमच्या विचाराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कॅम्पस क्लबने पुढाकार घेतला आहे. पवनचक्की बनविणे हे कृतिशील विद्यार्थ्यांना संधीच नव्हे तर आव्हानही असणार आहे. अक्षय ऊर्जादिनानिमित्त या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे. पहिला गट इयत्ता ३ री ते ५ वी व दुसरा गट इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. स्पर्धा जालना रोडवरील लोकमत भवन येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम नावनोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर एक कीट दिले जाणार आहे. ते स्पर्धकाला घरी नेता येईल. निवडक विद्यार्थ्यांना परीक्षकांसमोर प्रयोग सादरीकरणाची संधी मिळेल. या स्पर्धेत जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एलईडी लाईट चालू करावे लागतील. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नावनोंदणी करण्याची शेवटची तारीख १४ आॅगस्ट आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.अधिक माहितीसाठी अश्विनी चौधरी (८८८८८२६७६२-बीड बायपास ), शीतल लड्डा (८८८८८८९५०६ - वेदांतनगर) किंवा जया तसतोडे (९१५८०४१५०५- सिडको) यांच्याशी संपर्क साधावा.