शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कंपनी म्हणते आधी जुने पैसे द्या, मगच रेमडेसिविर मागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन दोन महिन्यांपूर्वी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी बंगळुरू येथील कंपनीकडून ...

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन दोन महिन्यांपूर्वी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी बंगळुरू येथील कंपनीकडून केली. मात्र, प्रशासनाने आजपर्यंत कंपनीला बिल अदा केले नाही. त्यातच कंपनीला ६ हजार इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली. कंपनीनेही जुनी ५७ लाखांची थकबाकी जमा केल्याशिवाय नवीन इंजेक्शन मिळणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे महापालिकेची इंजेक्शन खरेदी संकटात सापडली आहे.

महापालिकेत रेमडेसिविर इंजेक्‍शन चोरी प्रकरण गाजत असतानाच प्रशासनाने आणखी १० हजार इंजेक्शनची ऑर्डर कंपनीला दिली. कंपनीने मागे अवघ्या ६०० रुपयांमध्ये दिलेल्या इंजेक्शनची किंमत १,४०० रुपये रुपये केली. महापालिकेने त्यास होकार दिला. कंपनीने नंतर जुनी थकबाकी भरल्याशिवाय इंजेक्शन देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. सध्या कंपनीकडे स्टॉकही उपलब्ध नाही. महापालिकेने आता मंजूर निधीतून फक्त ६ हजार इंजेक्शनची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंजेक्शन नसले तरी आलबेल

महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असताना मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दररोज ३०० इंजेक्शनचा वापर करण्यात येत होता. मागील काही दिवसांपासून मनपाकडे एकही इंजेक्शन शिल्लक नाही. रुग्णांना इंजेक्शन न देता बरे करण्यात येत आहे. मग रुग्णालयाने ६ हजार इंजेक्शनचा वापर चुकीच्या पद्धतीने केला का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गरज नसताना ज्या रुग्णांना इंजेक्शन देण्यात आले, त्यांना नंतर साइड इफेक्ट होतील, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.