शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

कंत्राट रद्द करण्याची धमकी देताच कंपनी ताळ्यावर

By admin | Updated: August 8, 2014 01:26 IST

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला (एसीडब्ल्यूयूसीएल) कंत्राट रद्द करण्याचे पत्र गेल्या गुरुवारी दिले होते.

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला (एसीडब्ल्यूयूसीएल) कंत्राट रद्द करण्याचे पत्र गेल्या गुरुवारी दिले होते. त्या धमकीवजा पत्रामुळे कंपनीचे संचालक ताळ्यावर आल्यामुळे आज समांतर जलवाहिनीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला, असे म्हणावे लागेल. ३० एप्रिल २०१३ पासून सुरू झालेला समांतरचा पत्रप्रपंच आज थांबला. पीपीपी मॉडेलवरील ही योजना असल्यामुळे नफा-तोट्याचा विचार न करता सुरू करण्यामागे एसीडब्ल्यूयूसीएल कंपनी तयार कशामुळे झाली, हे कंपनीने सांगितले नाही. महापालिकेने शहरासाठी तयार केलेल्या ७९२ कोटी रुपयांच्या समांतर जलवाहिनीची योजना २०० कोटी रुपयांऐवजी ४६२ कोटी ८० लाख रुपयांनी महागली आहे. ही रक्कम देणार कोण, योजनेला विलंब कुणामुळे झाला, या सगळ्यांवर परिणामकारक तोडगा काय, हे गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे समांतरचे काम हवेत केलेला गोळीबार आहे की, आचारसंहिता लागण्यापूर्वी मनपाने उडविलेला बार आहे हे कळण्यास मार्ग नाही. महापौर कला ओझा यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कशासाठी घेतला, हा प्रश्नआहे. १ सप्टेंबरपासून खाजगीकरणशहरातील पाणीपुरवठ्याची देखभाल, दुुरुस्ती व वितरण, वीज बिल भरण्याची जबाबदारी एसीडब्ल्यूयूसीएलकडे जाणार आहे. कंपनीकडे मनपाचे ३०० व स्वत:चे ३०० असे ६०० कर्मचारी असतील. यांचे वेतन कंपनी करील. सध्या कंपनी ६५ अभियंत्यांकडून काम करून घेत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात युतीचे सरकार येईल. मग योजनेला शासनाकडून अनुदान वाढवून घेऊ, तसेच केंद्र शासनाकडेही अनुदानासाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्याला मनपा सहकार्य करील. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीवर योजना महाग झाल्यामुळे पडणारा बोजा अशा पद्धतीने हलका करण्याचा विचार कंपनीने बोलून दाखविला. राज्यात कुणाचे सरकार येणार हे येणारा काळ सांगेल. मात्र, मनपा आणि कंपनीच्या मनसुब्यांत औरंगाबादच्या नागरिकांचे हाल होऊ नयेत, ही अपेक्षा. काम कसे?समांतर जलवाहिनी प्रकरणात न्यायालयीन लढा देणारे राजेंद्र दाते म्हणाले, मनपा आणि ठेकेदार नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. जनहित याचिकाप्रकरणी न्यायालयाने राज्य शासनाला निर्देश दिले आहेत. अर्जदाराचे म्हणणे ऐकून घ्यावे. याप्रकरणी अजून सुनावणीच झालेली नाही. असे असताना पालिकेने काम सुरू करण्यासाठी आदेश देणे म्हणजे यामध्ये गौडबंगाल आहे.