शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेत्या अभय शिंदेचे जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:23 IST

इंग्लंड येथील न्यू कॅसल येथील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत कास्यपदक जिंकून भीमपराक्रम करणारा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याचे आज सायंकाळी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. मूळचा कन्नड येथील असणाऱ्या अभय शिंदे याने न्यू कॅसल येथे झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात कास्यपदक जिंकले होते.

औरंगाबाद : इंग्लंड येथील न्यू कॅसल येथील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत कास्यपदक जिंकून भीमपराक्रम करणारा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याचे आज सायंकाळी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.मूळचा कन्नड येथील असणाऱ्या अभय शिंदे याने न्यू कॅसल येथे झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात कास्यपदक जिंकले होते. पदकविजेती कामगिरी केल्यानंतर अभय शिंदेचे इंग्लंडहून मुंबई येथे सकाळी १० वाजता आगमन झाले आणि मुंबई येथून तो आज दुपारी ४ वाजता औरंगाबादेत दाखल झाला. या वेळी त्याचे खेळाडूंनी जोरदार स्वागत केले. या वेळी राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, आनंद आंचलकर, वीरभद्र गादगे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे यांच्यासह अभय शिंदेचे वडील कृष्णा शिंदे, आई सुरेखा शिंदे, काका प्रवीण शिंदे, राकेश खैरनार उपस्थित होते.त्यानंतर अभयचा शिवछत्रपती महाविद्यालयातही सत्कार करण्यात आला. यावेळी अभयसोबत राष्ट्रकुल स्पर्धेत कास्यपदक जिंकणारा कोल्हापूरचा आदित्य अंगल व हर्षदा चमदमकोंडवार हे खेळाडू होते. या प्रसंगी शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही. अष्टेकर, अभिजित आवरगावकर, नितीन थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, राकेश खैरनार, संजय भूमकर, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन आदी उपस्थित होते.अभयचे भवितव्य उज्ज्वलराष्ट्रकुल स्पर्धेत अभय शिंदे याने केलेली पदकविजेती कामगिरी ही मराठवाड्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. अभय शिंदे याच्यासह जागतिक स्पर्धेत सहभागी होणारा तुषार आहेर, दुर्गेश जहागीरदार यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. तुषार आहेर याची आॅस्ट्रेलियात होणाºया सीनिअर राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेसाठी संभाव्य भारतीय संघात निवड झाली आहे. दुर्गेश जहागीदारला प्रशिक्षणासाठी इटली येथे पाठवणार आहे. हे औरंगाबादचे तिन्ही खेळाडू आॅलिम्पिकच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे खेळाडू असल्याचे राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.