शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बीडीओ सुरवसे यांच्या चौकशीसाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:54 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान त्यांच्या थेट वैयक्तीक बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेऊनही पूर्णा येथील गटविकास अधिकारी विठ्ठल सुरवसे यांनी नांदेड येथील एका खाजगी दुकानदाराला यासाठी पैसे वर्ग केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान त्यांच्या थेट वैयक्तीक बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेऊनही पूर्णा येथील गटविकास अधिकारी विठ्ठल सुरवसे यांनी नांदेड येथील एका खाजगी दुकानदाराला यासाठी पैसे वर्ग केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे़स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा अनुदानाचा निधी त्यांच्या थेट बँक खात्यावर जमा न करता तो खाजगी दुकानदाराकडे देण्यात आला़ व खाजगी दुकानदाराने लाभार्थ्यांना थेट साहित्य दिल्याने गोंधळ झाल्याची घटना गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेचा विषय बनली होती़ जि़प़चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्यावर या प्रकरणात अनेक आरोप झाले़ त्यानंतर त्यांची बदलीही झाली़ आता असाच प्रकार पुर्णेत झाल्याची चर्चा आहे़ जि़प़च्या सर्वसाधारण सभेने लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता़ महिनाभरापूर्वी पूर्णा पंचायत समितीला जि़प़ अध्यक्षा उज्ज्वला राठोड, सदस्य अजय चौधरी यांच्यासह अन्य अधिकाºयांनी भेट देवून कागदपत्रांची तपासणी केली होती़ त्यानंतरही गटविकास अधिकारी विठ्ठल सुरवसे यांनी २७ लाख ६० हजार रुपयांचा निधी नांदेड येथील एका दुकानदाराला दिला असल्याच्या तक्रारी जि़प़ सदस्यांकडे करण्यात आल्या होत्या़ त्या अनुषंगाने मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली़ त्यामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम़ व्ही़ करडखेलकर व जि़प़ सदस्य अजय चौधरी या दोन सदस्यीय समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला़ ही समिती महिनाभरात आपला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार आहे़ त्यामुळे याबाबत बीडीओ सुरवसे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याची जि़प़ वर्तुळातून चर्चा होताना दिसून येत आहे़