शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी फुटपाथवर, ग्राहकांची वाहने रस्त्यावर

By | Updated: November 26, 2020 04:13 IST

रस्त्यांचा ‘वापर’ कोण करतोय? चिस्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत भाग ३ खर्च - ३ कोटी ५२ लाख रस्त्याची लांबी ...

रस्त्यांचा ‘वापर’ कोण करतोय?

चिस्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत

भाग ३

खर्च - ३ कोटी ५२ लाख

रस्त्याची लांबी - १ किलोमीटर

रस्त्याची रुंदी - ७. ५

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या अनुदानातून महापालिकेने सिडको एन -६ चिस्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत ३ कोटी ५२ लाख रुपये खर्च करून रस्ता तयार केला. या रस्त्यावर नागरिकांना पायी चालण्यासाठी सुद्धा जागा भेटत नाही हे विशेष. फुटपाथ व्यापाऱ्यांनी गायब केले. व्यापाऱ्यांच्या ग्राहकांची वाहने आता रस्त्यावर राजरोसपणे लागत आहेत. या सर्व परिस्थितीकडे महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस डोळेझाक करीत आहेत.

शहरातील रस्ते दर्जेदार आणि सिमेंटकॉंक्रिटचे तयार व्हावेत म्हणून मागील सहा वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाने महापालिकेला तब्बल २७६ कोटी रुपये दिले. या अनुदानातून तीन वर्षांपूर्वी महापालिकेने चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत सिमेंट रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. २४ मीटर रुंद रस्त्यावर महापालिकेने १५ मीटरपर्यंत दोन्ही बाजूने सिमेंट रस्ता तयार केला. ७.५ मीटर एका बाजूने काम करण्यात आले. चिश्तिया चौकापासून थेट बजरंग चौकापर्यंत रस्त्याचा वापर कुठे ८ फूट तर कुठे ६ फूट एवढाच होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहने सिमेंट रस्त्यावर उभी असतात. पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

नागरिकांच्या हक्काचे फुटपाथ गायब

महापालिकेने १५ मीटर रुंद सिमेंट रस्ता केला. दोन्ही बाजूने चार-चार मीटर जागा फुटपाथसाठी सोडण्यात आली. ही जागा आता महापालिकेच्या नकाशावरच दिसते. या भागातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. या व्यापाऱ्यांकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने ते थेट रस्त्यावर उभी राहतात.

साडेतीन कोटी रुपये खर्च तरी कशाला केले?

चिश्तिया चौक ते बजरंग चौकापर्यंत रस्त्याचा वापर एक वाहन जाईल एवढाच होतो आहे. महापालिकेने तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करून गुळगुळीत सिमेंट रस्ता तरी कशासाठी केला असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.