शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बंडावर मौन बाळगत दोन्ही काकांचे विकासावर भाष्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 00:32 IST

बीड पुतण्याच्या बंडामुळे कौटुंबिक कलहामध्ये सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आज एकाच व्यासपीठावर आले खरे, परंतु दोघांनीही पुतण्यांच्या बंडासंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही.

प्रताप नलावडे बीडपुतण्याच्या बंडामुळे कौटुंबिक कलहामध्ये सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते आज एकाच व्यासपीठावर आले खरे, परंतु दोघांनीही पुतण्यांच्या बंडासंदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. विकासाच्या मुद्यांवर बोलत त्यांनी रा.कॉ. च्या प्रचाराचा नारळ फोडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपनेते जयदत्त क्षीरसागर हे दोघेही सध्या पुतण्यांच्या बंडामुळे त्रस्त आहेत. बीडमध्ये पुतणे संदीप क्षीरसागर यांनी घरातच बंडाचे निशाण फडकावत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात नगरपालिका निवडणुकीत उडी घेतली आहे. तर सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी काका विरोधात बंड करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी रा.कॉ. च्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी तटकरे आणि क्षीरसागर एकाच व्यासपीठावर होते. कौटुंबिक बंडाने घायाळ झालेल्या दोन्ही काकांकडून यासंदर्भात नेमके काय स्पष्टीकरण असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. परंतु जयदत्त क्षीरसागर यांनी आपण पक्षाची निष्ठा जपली असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचाच प्रचार करणार असल्याचे सांगितले. तटकरे यांनी आज जे पक्षासोबत आहेत, तेच उद्याही असतील, इतकेच काय ते सूचक विधान केले. दोघांनीही अतिशय संयमी भूमिका घेत, या गृहकलहाचा उल्लेख टाळला. जयदत्त क्षीरसागर यांनी पालिकेच्या विकासाचे मुद्दे मांडत सत्तेत असताना पालिकेच्या माध्यमातून विकास कसा साधला याची मांडणी आपल्या भाषणातून केली. बीड शहराला शांतताप्रिय नेतृत्व हवे असल्याचे सांगत डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या आजवरच्या कामाचे कौतुक केले. तटकरे यांनीही आपल्या भाषणातून विकास कामांचा मुद्दाच प्रभावीपणे मांडला.