शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

दिलासा ! जिल्ह्यात सोमवारी ५५० रुग्ण कोरोनामुक्त; ३८८ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 12:39 IST

corona virus जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५३ हजार ३५७ झाली आहे, तर आतापर्यंत ४९ हजार ००९ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देउपचारादरम्यान सोमवारी पाच जणांचा मृत्यू झालाजिल्ह्यात सध्या ३,०५२ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात ३८८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर तब्बल ५५० जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील चार आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३,०५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५३ हजार ३५७ झाली आहे, तर आतापर्यंत ४९ हजार ००९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३८८ रुग्णांत मनपा हद्दीतील ३५७, तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील तब्बल ५२४ आणि ग्रामीण भागातील २६, अशा एकूण ५५० रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना हर्सूल येथील भगतसिंगनगरातील ७६ वर्षीय पुरुष, वैजापूर तालुक्यातील तालखेड येथील ६५ वर्षीय स्त्री, सिल्लोड तालुक्यातील बिलालनगरातील ५८ वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनीतील ६० वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर २, एन-नऊ, श्रीकृष्णनगर १, समतानगर २, बन्सीलालनगर १, गादिया विहार ५, राज व्हॅली १, प्रतापनगर १, हर्षनगर १, गजानन मंदिर परिसर ४, रेल्वे कॉलनी १, पन्नालालनगर १, इटखेडा १, नागेश्वरवाडी २, बेगमपुरा १, कासलीवाल तारांगण ३, देवगिरी व्हॅली, पडेगाव १, मयूर पार्क १, एन-अकरा, नवजीवन कॉलनी १, एन-तेरा, भारतनगर १, जटवाडा रोड १, शिवेश्वर कॉलनी, हर्सूल १, एन-अकरा येथे ६, वीणा सो. ३, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटलजवळ १, छत्रपतीनगर, बीड बायपास १, एन-दोन, रामनगर २, एन-तीन, सिडको १, उत्तरानगरी, चिकलठाणा १, सातारा परिसर २, बीड बायपास ७, राजेशनगर १, सारंग सो., गारखेडा परिसर १, टिळकनगर २, कैलासनगर १, मयूरबन कॉलनी १, गारखेडा ३, पुंडलिकनगर १, अलंकार सो., १, अय्यप्पा मंदिर १, निरमन सो., १, जालननगर १, आनंद विहार इटखेडा १, शहांगज २, शिवशंकर कॉलनी १, अंगुरीबाग १, विश्रामबाग कॉलनी १, पदमपुरा २, मिलियन पार्क सो., १, बजाजनगर १, कोमलनगर १, जयभवानीनगर ३, शिवाजीनगर ४, अरिहंतनगर १, मातोश्रीनगर १, देवानगरी १, नाथ प्रांगण १, देवळाई १, एन-आठ येथे १, एन-सात येथे १, एन-पाच, गुलमोहर कॉलनी १, रोशन गेट १, राणानगर १, कासलीवाल मार्वल, सातारा परिसर १, भगतसिंगनगर, हर्सूल १, उल्कानगरी ५, विद्यानगर, सेव्हन हिल १, भगवती कॉलनी १, जवाहर कॉलनी १, टीव्ही सेंटर २, एन-दोन, ठाकरेनगर १, रामकृपा हा. सो १, शहानूरवाडी ४, त्रिमूर्ती चौक १, बीड बायपास, देवळाई परिसर १, एन-अकरा, रवीनगर १, एन-सात शास्त्रीनगर २, भवानीनगर, जुना मोंढा २, विजयनगर, सातारा परिसर १, ज्ञानेश्वरनगर १, दत्तनगर २, मोहिरा चौक १, उस्मानपुरा २, न्यू बालाजीनगर २, दशमेशनगर १, हॉटेल प्लाजा, आरटीओ ऑफिसजवळ १, न्यू एसबीएच कॉलनी १, वेदांतनगर २, एन-चार, सिडको १, रामनगर १, मनीषा कॉलनी १, गजानननगर १, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ १, जाधववाडी १, बालाजीनगर ३, एन-दोन, सिडको १, रेल्वे स्टेशन परिसर १, श्रेयनगर १, रोकडिया हनुमान कॉलनी १, वेदांतनगर, एमआयडीसी २, अमृतसाई प्लाजा, रेल्वे स्टेशन परिसर २, कांचनवाडी १, जुना भावसिंगपुरा १, नूतन कॉलनी १, दत्त मंदिर परिसर, बीड बायपास १, म्हाडा कॉलनी, शहानूरवाडी २, बन्सीलालनगर ३, श्रीनिकेतन कॉलनी १, न्यू श्रेयनगर १, आनंद विहार, पैठण रोड १, एकनाथनगर १, लक्ष्मीनगर १, नागसेन कॉलनी १, आदित्यनगर, गारखेडा परिसर २, एसआरपीएफ कॅम्प परिसर १, अन्य १८४.

ग्रामीण भागातील रुग्णलासूर स्टेशन २, वाळूज २, रांजणगाव १, शिवना, सिल्लोड १, वडगाव को. १, बजाजनगर ५, सिडको महानगर एक २, अन्य १७.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद