शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सुरतहून यायचे, चोरी करून जायचे

By admin | Updated: March 1, 2016 00:50 IST

औरंगाबाद : गर्दीच्या ठिकाणी सावज हेरून ठेवायचे... टोळीतील बालकांनी त्याला घेराव घालायचा... समोरून असलेल्या एकाने त्याला काही तरी बोलण्यात गुंतवून ठेवायचे

औरंगाबाद : गर्दीच्या ठिकाणी सावज हेरून ठेवायचे... टोळीतील बालकांनी त्याला घेराव घालायचा... समोरून असलेल्या एकाने त्याला काही तरी बोलण्यात गुंतवून ठेवायचे आणि पाठीमागून दुसऱ्या बालकाने खिशातील मोबाईल लंपास करायचा, अशी पद्धत वापरून मोबाईल चोरीसाठी आठवडी बाजार करणारी ही कुख्यात टोळी क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी रात्री खोकडपुरा (सामाजिक न्याय भवन परिसर) भागातून जेरबंद केली. आठ जणांच्या या टोळीत चार अल्पवयीन मुले आहेत. अनिल महत्तो, सोनू रामजीवन महत्तो, शेख जुबेर शेख वरसल्ली, विजय विनोद महत्तो (सर्व रा. महाराजपूर, जि. साहबगंज, झारखंड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना सोमवारी न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी या टोळीकडून दोन हजार २८० रुपयांची रोकड, ७२ हजार रुपयांचे ११ मोबाईल, दोन चाकू, मिरचीपूड आणि दोरी असे साहित्य जप्त केले आहे. सर्व चोरटे हे अशिक्षित आहेत, अशी माहिती तपास अधिकारी फौजदार संजय अहिरे यांनी दिली.याबाबत पोलिसांनी सांगितले की, मूळ झारखंड राज्यातील असलेल्या या टोळीचा मुक्काम सुरतला असतो. ते प्रत्येक शनिवारी रात्री सुरतहून निघायचे, रविवारी सकाळी शहरात उतरल्यावर दुपारपर्यंत बसस्थानकात फिरायचे. तेथून ते रविवार बाजार, जाधववाडी, भाजीमंडई इ. गर्दीची ठिकाणे ‘टार्गेट’ करून मोबाईल, पाकिटांची चोरी करायचे. विशेष म्हणजे ही टोळी काम फत्ते झाले की लगेच शहर सोडायची. त्यामुळे पोलिसांना या टोळीबाबत माहिती नव्हती.