शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

‘कलर्स’ व ‘लोकमत सखी मंच’; सासू- सुनांची रंगणार जुगलबंदी

By admin | Updated: December 17, 2015 00:16 IST

औरंगाबाद : सासू- सुनेचे नातेच विलक्षण. त्यामध्ये अनेक पदर असतात. सासूची प्रतिमा कजाग अशी दाखविली जात असली, तरी सासू कधी आई असते, तर कधी बहिणीसारखी साथ देणारी.

औरंगाबाद : सासू- सुनेचे नातेच विलक्षण. त्यामध्ये अनेक पदर असतात. सासूची प्रतिमा कजाग अशी दाखविली जात असली, तरी सासू कधी आई असते, तर कधी बहिणीसारखी साथ देणारी. नव्या जमान्यात तर आई- मुलीसारखे नाते असणाऱ्या सासू- सुनेच्या जोड्याही पाहावयास मिळतात. याच सगळ्या नात्यांचे पदर उलगडून दाखविणारा ‘लोकमत सखी मंच’ आणि ‘कलर्स’ प्रस्तुत ‘जोडी नं. १ : सासू-सून’ हा कार्यक्रम २१ डिसेंबर रोजी सायं. ४ वा. लोकमत भवन येथे रंगणार आहे. जीवनाचे अनेक रंग दाखविणारे कौटुंबिक चॅनल कलर्स आणि स्त्रियांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देणारा ‘लोकमत सखी मंच’ खास आपल्यासाठी ही मेजवानी घेऊन येत आहे. नात्यातील अनेक रंगांचे वैविध्यपूर्ण दर्शन घडविणारा ‘जोडी नं. १ : सासू-सून’ हा कार्यक्रम म्हणजे सासू- सुनेच्या नात्यातला दुवा ठरेल. कलर्स चॅनलवरच्या अनेक सासू- सून जोड्या सर्वपरिचित आहेत. यामधील ‘ससुराल सिमरन का’मधील सून सिमरन व सासू सुजाता या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. आपल्या कुटुंबासाठी एका सुनेने केलेला त्याग, तिचे प्रेम, तिची जबाबदारी आणि कर्तव्ये याची सुरेख सांगड यामध्ये दाखविली आहे, तर तिच्या संघर्षात तिच्या सासरचा आणि सासूचा भक्कम पाठिंबा हासुद्धा तेवढाच महत्त्वाचा दाखविण्यात आला आहे. ‘मेरी आशिकी तुमसे है’मधील ईशानी आणि सासू अंबा यांच्या नात्यातील विविध कंगोरे, ‘बा’ आणि त्यांच्या सुनांचे नाते या मालिकेतत अतिशय ताकदीने मांडले गेले आहेत. अशाच प्रकारच्या अनेक सासू- सून जोड्या कलर्सवर वेगवेगळ्या मालिकांमधून रसिक चाहत्यांना भेटत असतात. आता वेळ आली आहे आपल्या अवतीभोवती असलेल्या सासू- सुनेमधील नात्यांची जुगलबंदी अनुभविण्याची. विचारांची जुगलबंदी, नात्याची वीण, संसारातील तडजोड, परस्पर सामंजस्य यावर या कार्यक्रमाची संपूर्ण आखणी राहणार असून नाट्य, मनोरंजन, मिश्कीलता, कोपरखळ्या अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल. ही स्पर्धा नि:शुल्क असून, जास्तीत जास्त सासू- सुनांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी ११ ते ५ या वेळेत ९८५०४०६०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा. रंगतदार चार फेऱ्या स्पर्धेसाठी चार फेऱ्या असणार आहेत. पहिली फेरी परिचयाची असेल. यामध्ये सासू- सुनेस एकमेकींची ओळख करून द्यावी लागेल. दुसऱ्या टॅलेंट फे रीमध्ये सासू- सून मिळून गाणे किंवा डान्स किंवा नक्कल किंवा अभिनय काहीही सादर करू शकतात. तिसऱ्या मॅचिंग फेरीत सासू- सुनेला मॅचिंग पेहराव करायचा आहे. त्यानंतर चौथी फेरी परीक्षक फेरी असेल. यात परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सासू- सुनेला द्यावी लागतील.