शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजच्या प्राध्यापकांना ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:34 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्राध्यापकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मागील दोन वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया मागील पाच दिवसांत पूर्ण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या प्राध्यापकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. मागील दोन वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया मागील पाच दिवसांत पूर्ण झाली आहे. यात चार जिल्ह्यांतील ३६८ प्राध्यापकांना पदोन्नती मिळाली असल्याची माहिती विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.अनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नेमणुका, पदोन्नतीची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनामार्फत करण्यात येते. महाविद्यालयातील प्राध्यापकांना ‘करिअर अ‍ॅडव्हान्समेंट स्किम’ (कॅश)अंतर्गत पदोन्नती देण्याची प्रक्रिया दोन वर्षांपासून राबविण्यात आलेली नव्हती. प्रत्येक वेळी कोणत्याही कारणावरून ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती; मात्र ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद येथे कॅम्प आयोजित करून पात्र प्राध्यापकांना पदोन्नती देण्यात आली आहे.यात औरंगाबाद शहर ५५, औरंगाबाद ग्रामीण ६६, जालना ७०, बीड १२९ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ४८ प्राध्यापकांचा समावेश आहे. पदोन्नती दिलेल्या सर्व प्राध्यापकांना आगामी दोन दिवसांत पदोन्नतीचे पत्र देऊन स्थानापन्नतेसाठीचे प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ. सरवदे यांनी सांगितले. या निर्णय प्रक्रियेमुळे बहुतांश प्राध्यापकांची पदोन्नती सहायकवरून सहयोगी प्राध्यापक अशी झाली आहे.विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयातील कॅश पूर्ण केले आहे; मात्र विद्यापीठातील विभागांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना मागील तीन वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. प्राध्यापकांच्या संघटनेने वारंवार याविषयी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना निवेदने दिली आहेत. मात्र तज्ज्ञ, उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ प्रशासनाच्या तारखा जुळत नसल्यामुळे या प्रक्रियेस विलंब झाला आहे. यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांनी ‘नॅक’च्या कामाकडेही दुर्लक्ष केलेले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने ५ ते ८ मार्चदरम्यान विद्यापीठातील ‘कॅश’ आयोजित केल्याची माहिती डॉ. वाल्मीक सरवदे यांनी दिली.