शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: August 19, 2016 00:59 IST

उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने

उस्मानाबाद : दलित, आदिवासी, पारधी, भटके विमुक्तांच्या मुला-मुलींना महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती द्यावी आदी मागण्यांसाठी श्रमिक मानवाधिकार संघ, मानवी हक्क अभियानच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून निदर्शनेही केली. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.जिल्ह्यातील दलित, आदिवासी, पारधी, मांग, महार या समाजातील भूमिहिनांनी गायरान, फॉरेस्टच्यो जमिनी वहितीखाली आणून आपली उपजिविका भागवित आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार उभ्या पिकांचा पंचनामा करणे अपेक्षित आहे. परंतु, शासन आणि प्रशासनही याकडे डोळेझाक करीत आहे. वारंवार पाठपुरवा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने १८ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुताळ्यापासून मोर्चा निघाला. हा मोर्चा शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आल्यानंतर निदर्शनेही करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना बजरंग ताटे यांनी केसरी कार्डधारकांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य देण्यात यावे, लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने केलेल्या शिफारशींचा कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, सरकारी गायरान जमीन व फॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली आहे. सदरील जागा त्या-त्या कुटुंबाच्या नावे करावी आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या. मोर्चामध्ये भाई बजरंग ताटे, माया शिंदे, यशवंत फडतरे, हनुमंत पाटुळे, विक्रम शिंदे, वाल्मिक सगट, मंगल सोनटक्के, दादाराव कांबळे, नवनाथ शिंदे, तारामती कसबे, राजाभाऊ मस्के, सुमन काळे, खुदबुद्दीन शेख यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)