नांदेड : सीआरपीसी कलम १५६(३) मधील तरतुदींच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांना अटक करू नये या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनी गुरूवारी सामूहिक रजा आंदोलन केले़ या आंदोलनामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते़महाराष्ट्र राज्य तहसीलदार तथा नायब तहसीलदार संघटनेने महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांना निवेदन देवून कलम १५६ (३) मधील तरतुदीच्या अनुषंगाने शसनाने महसूल कर्मचारी, तलाठी, मंडळी अधिकारी, नायब तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांविरूध्द अटकेची कार्यवाही करून नये अशी मागणी केली होती़ त्यावेळी अशी कार्यवाही होणार नाही असे तोंडी आश्वासन देवूनही त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही़ अथवा कोणतेही लेखी परिपत्रक शासनाकडून निर्गमीत करण्यात आले नाही़ त्यामुळे शासनाने गृह विभागाला तत्काळ लेखी निर्देश द्यावेत अशी मागणी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे़ याच मागणीसाठी राज्यभरात महसूल अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले़ या सामूहिक रजा आंदोलनात जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार सहभागी झाले होते़ उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदारांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शनेही केली़ यावेळी हिंगोलीचे पुरवठा अधिकारी बोधवड यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला असतानाही आकसापोटी मध्यरात्री अटक करणाऱ्या पोलिस अधिकारी सय्यद यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली़ या आंदोलनात निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, प्रशांत शेळके, भागवत देशमुख, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, केशव नेटके, दीपाली मोतीयाळे, संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर,महादेव किरवले, विजय चव्हाण, जीवराज डापकर, अशेक नांदलगावकर, राजाभाऊ कदम, संतोष गोरड, सतीश सोनी, विजय येरावाड, सुरेखा नांदे, अरूणा संगेवार, संतोषी देवकुळे, सौ़इज्जपवार, सौ़ यु़एल़ कुलकर्णी, स्रेहलता स्वामी, श्रीमती यु़पी़ पांगरकर, कुंदा देशपांडे, डी़एऩ शास्त्री आदींची उपस्थिती होती़ या मागण्या मान्य न झाल्यास २८ जुलैपासून बेमूदत आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला़ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना सादर करण्यात आले़
महसूल अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन
By admin | Updated: July 25, 2014 00:31 IST