शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

कॅफोंनी केली जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल

By admin | Updated: August 9, 2014 00:34 IST

बीड : जि.प.तील विविध विकास कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले.

बीड : जि.प.तील विविध विकास कामात अनियमितता झाल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. मुख्य वित्त व लेखाधिकारी वसंत जाधवर यांनी उपोषणकर्त्यांना गुरुवारी धमकावल्याचे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर आंदोलनाला वेगळे वळण मिळाले. जाधवर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शुक्रवारी आ.पंकजा पालवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आ. पालवे यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजपाची भूमिका स्पष्ट केली.त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेत अधिकारी व सत्ताधारी यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यांच्या संगणमतानेच कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असली तरी केंद्र सरकारच्या समितीकडून चौकशी झाली पाहिजे. घोटाळेबाजांवर कारवाई होत नाही तोपर्यंत माघार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात आपण पाठपुरावा करणार असून भ्रष्टाचार करणाऱ्यांना कधीही माफ केले जाणार नाही, असे त्या म्हणाल्या. भारती- जाधवर यांच्या बोलण्यात विसंगती२ आॅगस्ट २०१४ रोजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जि.प.तील तक्रारीच्या अनुषंगाने बैठक बोलावली होती. यावेळी १३ वा वित्त आयोग व झेडपीआरच्या निधीवाटपाचे ठराव उपलब्ध नाहीत असे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांनी सांगितले होते तर कॅफो वसंत जाधवर यांनी ठराव आहेत, असे स्पष्ट केले. त्या दोघांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी पत्रजिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी गुरुवारी भाजपचे जि.प. सदस्य दशरथ वनवे, गटनेते मदनराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष संतोष हांगे, भाजयुमोचे शहराध्यक्ष शेख फारूक, सुधीर शिंदे यांना एक लेखी पत्र पाठविले आहे. त्यामध्ये त्यांनी आंदोलनाची दखल घेतली असल्याचे नमूद केले आहे. चौकशीसाठी जिल्हा कोषागार अधिकारी, लेखाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व माजलगाव तहसीलदार यांची समिती नेमली आहे, असे स्पष्ट केले आहे. मुख्य वित्त व लेखाधिकारी वसंत जाधवर यांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा प्रकारही त्यांनी पत्रात उल्लेखीत केला आहे. (प्रतिनिधी)४ आॅगस्टपर्यंत ठरावांच्या प्रती सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले होते; पण मुदतीत ठराव उपलब्ध न करुन कॅफो जाधवर यांनी चालढकल केली. त्यानंतर ७ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ठरावांच्या प्रती देण्यासाठी कॅफो जाधवर यांना संधी दिली. त्यानुसार जाधवर यांनी प्रती सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.