शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युतीची शक्यता होतेय धूसर

By admin | Updated: November 2, 2016 00:56 IST

उस्मानाबाद : शिवसेना-भाजपाने राज्य पातळीवर युतीची घोषणा केली असली तरी जिल्ह्यात युती होण्याची शक्यता धूसर होत आहे.

उस्मानाबाद : शिवसेना-भाजपाने राज्य पातळीवर युतीची घोषणा केली असली तरी जिल्ह्यात युती होण्याची शक्यता धूसर होत आहे. भाजपाला महत्वाच्या ठिकाणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सोडण्यास शिवसेना तयार नाही. त्यामुळे बोलणी रेंगाळली आहे. दरम्यान, दुसरीकडे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यासाठीची तयारी सुरुच ठेवली आहे.उस्मानाबादसह जिल्ह्यातील ८ नगरपालिका निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सर्वच प्रमुख पक्षांनी अंतर्गत साटे-लोटे करीत आपल्या पक्षाकडून सक्षम उमेदवार कशा पद्धतीने देता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसेना-भाजपाची जिल्ह्यात युती होते का? याकडेही अनेकांच्या नजरा आहेत. भाजपाने कळंब नगराध्यक्षपदाचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती. याबरोबरच परंडा आणि इतर काही नगराध्यक्षपदासाठीही भाजपाचा आग्रह कायम आहे. मात्र उस्मानाबाद, कळंब, परंडा आणि उमरगा या प्रमुख चारही ठिकाणच्या नगराध्यक्षपदाची जागा भाजपाला सोडण्यास शिवसेना तयार नसल्याने युतीचे घोडे आडले आहे. मंगळवारी भाजपा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी निभावण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची उस्मानाबादेत आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. निवडणूक कालावधीत पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहंचण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावेत, याबाबतचे मार्गदर्शन या बैठकीत करण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीला शहरातून मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दरम्यान, बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, त्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे.उस्मानाबाद नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी ३१ जणांनी ५८ अर्ज दाखल केले आहेत. तर नगरसेवक पदासाठी ४०२ जणांनी ५४४ अर्ज भरले आहेत. छाननीनंतर यातील किती उमेदवार शिल्लक राहतात हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.