शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग क्लासच्या कर्मचाऱ्यांना चोपले

By admin | Updated: June 30, 2017 00:17 IST

औरंगाबाद : मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरसह दोघांना बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आकाशवाणी चौकातील आकाश इन्स्टिट्यूट आॅफ नीट, आयआयटी- जेईई फाऊंडेशन्सच्या शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलींची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी येताच शिवसेनेच्या पन्नासहून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मॅनेजरसह दोघांना बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी (दि.२९) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.शिवहारी वाघ आणि रोहीत सूळ अशी छेडछाड करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दिल्ली येथील आक ाश इन्स्टिट्यूटची आकाशवाणी चौकात बँ्रच आहे. इन्स्टिट्यूटमध्ये नीट, जेईई फाऊं डेशनसाठी शिकवण्या चालतात. शिवहारी वाघ हा तेथे बॅ्रच मॅनेजर, तर रोहीत सूळ हा कार्यालयीन कर्मचारी आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलींना पाहून आरोपी सतत अश्लील कमेंट करीत असत. मुलींचे कपडे, शरीरयष्टीवर ते मुलींना बोलावून बोलत असत. सुरुवातीला मुलींनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडत असल्याने सर्व मुलींनी याविषयी आपापल्या पालकांकडे तक्रार केली. पालकांनी शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली. थोरात यांच्यासह शिवसेनेचे पन्नासहून अधिक कार्यकर्ते गुरुवारी कोचिंग क्लासवर पोहोचले. त्यांनी सुरुवातील मॅनेजर वाघ यास जाब विचारला आणि मुलींना छेडणाऱ्या कर्मचाऱ्यास बोलावून घेण्यास सांगितले. तो कर्मचारी तेथे आल्यानंतर मॅनेजरसमोर पीडित मुलींनी कालपर्यंत घडलेला प्रकार कथन केला. मॅनेजर, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांनाही बेदम चोप दिला. पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळुंके आणि कर्मचाऱ्यांनी इन्स्टिट्यूटमध्ये धाव घेऊन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि ठाण्यात नेले. पीडित मुलींना सोबत घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे पाच ते सहा मुलींनी महिला पोलीस अधिकारी आणि महिला तक्रार निवारण समितीच्या पदाधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात मुलींच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी दिली.शिवसेनेचे पदाधिकारी पीडित मुलींना घेऊन जिन्सी ठाण्यात गेले. पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक वसूरकर यांची भेट घेतली. कोचिंग क्लासमध्ये राडा केल्याचे आणि दोन जणांना चोप दिल्याचे समजताच वसूरकर यांनी पदाधिकाऱ्यांना खडसावण्यास सुरवात केली. यावेळी थोरात यांनी आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास पोलीस आयुक्तांकडे तक्रार करू, असा दम दिला. यामुळे उभयतांमधील खडाजंगी वाढली. हे पाहून शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी तुमच्या-आमच्या मुलींची छेडछाड होत असल्यास आम्ही शांत कसे बसणार, असा सवाल करीत कोणत्याही पालकाचा राग अनावर होतोच, असे स्पष्ट केले.