सूर्यकांत बाळापूरे , किल्लारीगेल्या पंधरा दिवसापासून पावसाने गुंगारा दिला आहे़ दिवसभर ढगाळ वातावरण राहत असल्याने त्याचा परिणाम रोगराई वाढण्यास होत आहे़ त्यामुळे सर्दी, ताप, डोकेदुखी, अशा आजारांच्या रूग्णांची संख्या वाढत आहे़ परिणामी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे़ किल्लारी व परिसरात यंदाच्या खरीप हंगामात पावसाने उघडीप दिली आहे़ त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे़ पावसासाठी याचना करीत आहे़ गेल्या पंधरा दिवसापासून दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होत आहे़ हवामानात बदल झाल्याने त्याचा परिणाम शेतातील पिकाबरोबरच नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे़ ढगाळ वातावरणामुळे सर्दी, डोकेदुखी, अंगात ताप भरणे, असे आजार वाढत आहेत़ त्यामुळे येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे़ या भागातील काही रूग्ण खाजगी दवाखान्यात उपचार घेत असले तरी गोरगरीबांची मात्र ग्रामीण रूग्णालयावर भिस्त आहे़ दररोज शंभरच्या जवळपास होणारी नोंदणी ही आता दोनशेपेक्षा जास्त झाली आहे़ परिणामी रूग्णालयातील वैैद्यकीय अधिकाऱ्यांवरही ताण पडत असल्याचे पहावयास मिळत आहे़ सकाळपासूनच नोंदणीसाठी रीघ लागत आहे़ यात बालकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ (वार्ताहर)
ढगाळ वातावरणामुळे साथीचे आजार बळावले
By admin | Updated: August 8, 2014 00:28 IST