उस्मानाबाद : जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध काढण्याचे प्रयत्न मंगळवारी रात्री फसल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवान हालचाली घडल्या. भाजपाने राष्ट्रवादीचा हात धरला तर शिवसेनेने काँग्रेसशी घरोबा केल्याने राष्ट्रवादी-भाजपा विरूध्द काँग्रेस-शिवसेना असा दुरंगी सामना रंगणार आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल १४२ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विविध कारणांमुळे मागील अनेक वर्षांपासून जिल्हा बँक अडचणींचा सामना करीत आहे. यामुळे विविध शाखांतील आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, याची झळ सर्वसामान्य शेतकऱ्यांसह सभासदांना सोसावी लागत आहे. त्यामुळेच जिल्हा बँक बिनविरोध काढण्याच्या हालचाली मागील आठवडाभर सुरू होत्या. यासाठी सर्वपक्षियांच्या बैठकीत विविध पक्षांनी दिलेल्या प्रस्तावांवर चर्चा होत होती. मात्र, मंगळवारी कुठल्याही प्रस्तावावर एकमत न झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार, हे जवळपास निश्चित झाले होते. त्यानंतर या चारही प्रमुख पक्षांनी आपापल्या पध्दतीने आघाडीसाठीचे प्रयत्न सुरू केले. मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेत एकत्र नांदत असलेल्या काँग्रेस-सेना जिल्हा बँक निवडणुकीसाठीही एकत्र आली. शिवसेनेने ६ तर काँग्रेसने ९ जागा लढविण्याचे निश्चित केल्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषदेत या दोन्ही पक्षांच्या वतीने जागा वाटपासह आघाडीची घोषणा करण्यात आली. दुसरीकडे भाजपाने राष्ट्रवादीची सोबत केली आहे. राष्ट्रवादी १२ तर भाजपा तीन जागांवर निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले. या दोन प्रमुख पॅनलमध्येच जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी आता चुरस रंगणार असून, ७ मे रोजी मतदान होणार असून, ९ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या १५ जागांसाठी सुमारे ८५० सभासद मतदानासाठी पात्र ठरले आहेत. दरम्यान, बुधवारी चारही प्रमुख पक्षांच्या आघाडीसाठी हालचाली सुरू होत्या. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार अर्ज माघारी घेण्यासाठी निवडणूक कार्यालयात उमेदवारांनी एकच गर्दी केल्याचे चित्र होते. (जि. प्र.) कृषी पतपुरवठा व विकासे (उस्मानाबाद)संजय देशमुखमनोगत शिनगारेकृषी पतपुरवठा व विकासे (तुळजापूर)सुनील चव्हाणबलभीम लोंढेकृषी पतपुरवठा व विकासे (उमरगा)बापूराव पाटीलहर्षवर्धन चालुक्यकृषी पतपुरवठा व विकासे (कळंब)गोकुळ शेळकेविकास बारकूलकृषी पतपुरवठा व विकासे (भूम)किरण पाटीलशिवाजीराव भोईटेकृषी पतपुरवठा व विकासे (परंडा)ज्ञानेश्वर पाटीलसूर्यभान लिमकरकृषी पतपुरवठा व विकासे (लोहारा)नागप्पा पाटीलदिनकर पाटीलकृषी पतपुरवठा व विकासे (वाशी)बिभीषण खामकरसुग्रिव कोकाटेअनुसूचित जाती राजेंद्र शेरखानेकैलास शिंदेमहिला प्रतिभा पाटीलप्रविणा कोलतेपुष्पाताई मोरेदीपाली पाटीलइतर मागासवर्गीयहरिश्चंद्र कुंभारत्रिेंबक कचरेशेती व इतर संस्थानारायण समुद्रेसतीश दंडनाईकबँक सहकारी पतसंस्थासुधीर पाटीलसुरेश बिराजदारविमुक्त जाती/भटक्या जमातीबाबूराव राठोडभारत डोलारे
बँकेच्या फडात दुरंगी सामना
By admin | Updated: April 30, 2015 00:36 IST