शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

क्लीप व्हायरल करणाºयास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:17 IST

अनुसूचित जातीच्या विवाहित महिलेवर अत्याचार करुन त्याची क्लीप व्हायरल करणाºया आरोपीला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि ४ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर इतर दोन आरोपींना खटल्यातून मुक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : अनुसूचित जातीच्या विवाहित महिलेवर अत्याचार करुन त्याची क्लीप व्हायरल करणाºया आरोपीला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि ४ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर इतर दोन आरोपींना खटल्यातून मुक्त केले.२०१५ मध्ये इतवारा पोलिसांकडे एक क्लिप आली होती. त्या क्लिपमधील महिलेचा पोलिसांनी शोध घेतला. इतवाराचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक पंकज देशमुख, पोउपनि सदाशिव ढाकणे यांनी त्या महिलेची चौकशी केली. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. इतवारा ठाण्याच्या हद्दीत ही महिला कुटुंबासह राहत होती. घराशेजारील सोनूसिंह दिलीपसिंह ठाकूर याने महिलेशी प्रेमसंबंध जोडले. त्यानंतर या महिलेची बदनामीकारक क्लिप तयार करुन व्हायरल करण्याची धमकी देऊन सोनूसिंहने पीडित महिलेकडे खंडणीची मागणी केली. त्यावेळी महिलेने दागिने विकून सोनूसिंहला ३० हजार रुपये दिले होते. बदनामीच्या भीतीने महिला दुसºया गावी राहण्यासाठी गेली, परंतु सोनूसिंह मात्र वारंवार तिच्याशी संपर्क ठेवून संबंधाची मागणी करीत होता. त्याला या कामात महेश ऊर्फ कट्टू रतनचंद गंगोत्रा व संतोष भगवानराव अन्नपूर्णे यांनी साथ दिली. या प्रकरणात इतवारा पोलिसांनी तिघांविरुद्ध बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविला. पुढे न्यायालयाने संतोष अन्नपूर्णे आणि महेश गंगोत्रा यांना जामीन दिला तर सोनूसिंह हा २०१५ पासून तुरुंगातच होता. हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर कुलकर्णी यांच्यासमोर चालला. १४ साक्षीदारांनी जबाब नोंदविले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. नितीन कागणे यांनी काम पाहिले.न्यायाधीश सुधीर कुलकर्णी यांनी बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी यातून तिघांची मुक्तता केली, परंतु भारतीय तंत्रज्ञान कायद्यान्वये सोनुसिंहला दोषी मानले. सोनूसिंहला कलम ६६ (ई) नुसार तीन वर्षे सक्तमजुरी, एक लाख रुपये दंड तसेच कलम ६७ (अ) प्रमाणे ५ वर्षे सक्तमजुरी व तीन लाख रुपये दंड ठोठावला. या दोन्ही शिक्षा सोनूसिंहला एकत्रित भोगावयाच्या आहेत. ४ लाखांच्या दंडातील ३ लाख ७५ हजार रुपये पीडित महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.