शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

पुन्हा सुरू होणार स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:29 IST

येत्या ४ जानेवारी २0१८ पासून स्वच्छता सर्वेक्षण हा उपक्रम सुरू होणार असून यात चांगली कामगिरी बजावणाºया नगरपालिकांनाच यापुढे निधी मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येत्या ४ जानेवारी २0१८ पासून स्वच्छता सर्वेक्षण हा उपक्रम सुरू होणार असून यात चांगली कामगिरी बजावणाºया नगरपालिकांनाच यापुढे निधी मिळणार आहे. यात हिंगोली नगर परिषदेने स्वच्छतेच्या सर्व उपक्रमांची तयारी केली असून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.हिंगोली नगरपालिकेने स्वच्छता अभियानात बाजी मारल्यानंतर आता या सर्वेक्षणासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. यात आता तीन घटकांसह त्यातील उपघटकांसाठी पालिकेला काम करावे लागणार आहे. खºया अर्थाने शहर स्वच्छतेला यामुळे गती येणार आहे. यात सेवा स्तरासाठी १४00 गुण आहेत. यामध्ये कचरा संकलन व वाहतुकीसाठी ४00, कचरा प्रक्रिया व विल्हेवाटीसाठी ३५0, हागणदारीमुक्तीतील सातत्यासाठी ४२0, माहिती, शिक्षण व संवादाद्वारे जागृतीसाठी ७0 तर क्षमता बांधणीसाठी ७0 गुण आहेत. या घटकात प्रत्येक भागातून ओला व सुका कचरा वेगवेगळा उचलावा लागणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कुंड्या ठेवाव्या लागतील. पुरेसा कामगार वर्ग त्यांना आवश्यक सोयी-सुविधा, उचललेल्या कचºयापासून गांडूळखत, प्लास्टिक, लोखंड असल्यास त्याच्या पुनर्वापराचे नियोजन, शहरातील उपलब्ध शौचालये अद्ययावत ठेवणे, नागरिकांना जनजागृतीसाठी कार्यक्रम तसेच या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणारा एक कक्ष उभारून त्यातही मनुष्यबळ ठेवावे लागणार आहे.प्रत्यक्ष निरीक्षण या घटकात १२00 गुण असून यात झोपडपट्टी, व्यापारी कचºयाचे नियोजन, गतवर्षीच्या तुलनेत आताची परिस्थिती तपासणे, मुख्य रस्ते, मुख्य सार्वजनिक ठिकाण, रेल्वे, बसस्थानक आदी ठिकाणच्या स्वच्छतेचा समावेश आहे. तर नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागाला १४00 गुण आहेत. यात नागरिकांच्या प्रतिक्रिया, सभा, उपलब्ध सुविधांची उपयोगिता, नव्या मागण्यांचा विचार केला जाणार आहे.