शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

घृष्णेश्वर संस्थानलाही आकारला स्वच्छता कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:26 IST

वेरूळ येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक आणि देश- विदेशातून पर्यटक येतात; परंतु येथील अस्वच्छता पाहून आपल्या देशाबद्दल त्यांच्या मनात कोणते चित्र निर्माण होत असेल. यापुढे थोडीही अस्वच्छता अथवा रस्त्याच्या कडेला घाण दिसता कामा नये. दैनंदिन स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी सरपंच आणि सदस्यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : वेरूळ येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक आणि देश- विदेशातून पर्यटक येतात; परंतु येथील अस्वच्छता पाहून आपल्या देशाबद्दल त्यांच्या मनात कोणते चित्र निर्माण होत असेल. यापुढे थोडीही अस्वच्छता अथवा रस्त्याच्या कडेला घाण दिसता कामा नये.दैनंदिन स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी सरपंच आणि सदस्यांना दिले.१५ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ‘स्वच्छता हीच सेवा’ या विशेष अभियानाचा समारोप आज २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी झाला. यानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वसंत सोळंके, स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राम लाहोटी आदींनी वेरूळ येथे भेट दिली. तेथे ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, पुरातत्व विभागाचे अधिकारी, घृष्णेश्वर मंदिर संस्थानचे पदाधिकारी, व्यापारी, पोलीस अधिकारी आणि दुकानदारांसोबत त्यांनी संवाद साधला.दैनंदिन स्वच्छता का होत नाही, याबद्दल माहिती जाणून घेतली. तेव्हा जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला दैनंदिन स्वच्छतेसाठी जिल्हा ग्रामनिधीतून एक ट्रॅक्टर व ट्रॉली देण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी दिले. याशिवाय ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी मनुष्यबळ आणि अन्य खर्चाकरिता घृष्णेश्वर मंदिर संस्थानने दरमहा ७ हजार रुपये, मोठ्या व्यापाºयांनी २०० रुपये आणि दुकानदारांनी १०० रुपये देण्याच्या सूचना केल्या. त्या सर्वांनी मान्यही केल्या.वेरूळ येथे येणारे भाविक व पर्यटकांसाठी सुलभ शौचालय उभारण्याचा निर्णयही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतला. त्यासाठी घृष्णेश्वर मंदिर संस्थानकडून जागा देण्याचे मान्य केले.लवकरच यासाठी एखाद्या संस्थेसोबत करार करून तेथे सुलभ शौचालय सुरू केले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सांगितले.