शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते काँक्रिटीकरणाने स्वच्छतेचा बोजवारा!

By admin | Updated: May 16, 2017 00:44 IST

जालना : शहरात चार महिन्यांपासून विविध भागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण येत आहे. खोदकामांमुळे घंटागाडी गल्लीबोळात पोहचत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात चार महिन्यांपासून विविध भागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण येत आहे. खोदकामांमुळे घंटागाडी गल्लीबोळात पोहचत नाहीत. परिणामी त्या त्या परिसरातील कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. शहरात दररोज सुमारे ८० टन कचरा निघतो. पैकी केवळ ५० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जालना शहरात डांबरी रस्त्यांच्या जागी सिमेंटचे रस्ते होत आहेत. यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले. कामे सुरू होण्यापूर्वी कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडी व कचराकुंड्या उचलण्यासाठी हायड्रोलिक वाहने आठ ते पंधरा दिवसांआड तरी येत असे. परंतु रस्ते खोदकामामुळे गत अडीच ते तीन महिन्यांपासून कचरा संकलनावर याचा परिणाम दिसून येत आहे. साचलेला कचरा पुन्हा नाल्यांमध्ये टाकला जात आहे. विशेषत: कचेरी रोड, सिंधी बाजार, सराफा, गांधी चमन परिसर, शिवाजी पुतळा, मंगळबाजार वेस, टाऊन हॉल आदी भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्य रस्ते बंद असल्याने घंटागाड्या अथवा कचरा संकलन करणारी अन्य वाहने अंतर्गत भागात येत नाही. कचरा टाकावा तरी कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागात उकिरडे असल्याने तेथे कचरा टाकून नागरिक मोकळे होतात. काही भागात कचराकुंड्याही नाहीत आणि उकिरडेही नाहीत. त्यामुळे ती कुटुंबे त्रस्त आहत. रस्ते कामे सुरू असल्याने घंटागाडी येऊ शकत नाही, अशी जुजबी उत्तरे स्वच्छता विभागातून मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या, शहरातील स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे. काही भागांत रस्त्याची कामे सुरू असल्याने स्वच्छतेवर परिणाम होत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगर पालिकेकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरात स्वच्छता अभियान राबवून उर्वरित रस्त्यांची कामे गतीने करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील.