शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ महाराष्ट्र’चे काम अर्ध्यावरच!

By admin | Updated: May 27, 2017 00:42 IST

जालना : आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरी व ग्रामीण भाग संपूर्ण पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.नागरी क्षेत्रातील जालना, परतूर, अंबड, भोकदरन नगरपरिषदा व घनसावंगी, मंठा, जाफराबाद व बदनापूर नगरपंचायत क्षेत्रात २०१५ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणानुसार २४ हजार ७३४ कुटुंब उघड्यावर शौचास जातात. ही संख्या लक्षात घेता मार्च २०१७ अखेर २४ हजार ३७६ स्वच्छतागृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. याकरिता सर्वच नगरपरिषदांनी मोठी यंत्रणा कामाला लावली. जनजागृती मोहिमेसह उघड्यावर जाणाऱ्यांवर गुड मॉर्निंग पथकांमार्फत गुन्हेही दाखल करण्यात आले. परंतु स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट अपूर्णच आहे. वरील आठ शहरांमध्ये २६ मे २०१७ अखेर अकरा हजार ३६७ कुटुंबांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर दहा हजार ९८८ स्वच्छतागृहांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. स्वच्छतागृहांच्या बांधकामात अंबड, परतूर, भोकरदन या नगरपरिषदांचे काम समाधानकारक असले तरी जालना, घनसावंगी, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर शहरांमधील बहुतांश कामे अपूर्ण आहेत.स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी २१ कोटी २० लाखांचा निधी मंजूर असला, तरी आतापर्यंत २२ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्वच्छतागृहांचा वापर हा सक्तीचा नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने नियमित सवयीचा भाग बनावा, हे जोपर्यंत प्रत्येकाला पटत नाही. तोपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण पाणंदमुक्ती अशक्य आहे. दरम्यान, नगर विकास विभागाचे सचिव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे जालना जिल्ह्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान कामाचा आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.