शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागरी वसाहतीतील गोदामांमुळे अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 20:36 IST

साहित्याची वाहतूक करणाऱ्या या जडवाहनाच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे

वाळूज महानगर : बजाजनगरात विविध व्यवसायिकांनी नागरी वसाहतीत गोदामे सुरु केली आहेत. साहित्याची वाहतूक करणाऱ्या या जडवाहनाच्या वर्दळीमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच परिसरातील नागरिक व वाहनधारकांना सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठी कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणा-या बजाजनगरात जवळपास एक हजार सोसायट्या आहेत. यात लाखावर नागरिक कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वाळूज औद्योगिक परिसरात कंपन्याला लागणारा कच्चा माल तसेच तयार माल ठेवण्यासाठी अनेक व्यवसायिकांनी बजाजनगरात गोदामे केली आहेत. याच बरोबर किराणा, मॉल व इतर मोठ्या व्यवसायिकांनी नागरी वसाहतीत भूखंड खरेदी करुन किंवा भाड्याने घेऊन गोदामे सुरु केली आहेत.

या गोदामात मालाची ने-आण करणा-या जडवाहनांची रात्रंदिवस वर्दळ असते. विशेष म्हणजे इंद्रप्रस्थ कॉलनी, आंबेडकर चौक, महाराणा प्रताप चौक, कामगार कल्याण भवन, मोरे चौक, जयभवानी चौक आदी नागरी वसाहतीत अनेकांनी गोदामे सुरु केली आहेत. या गोदामात कंटेनर, ट्रक, टेम्पो, लोडिंग रिक्षा आदी वाहनांतून मालाची ने-आण करण्यात येते.

मालाची ने-आण करणारी वाहने रस्त्यावर तासन्तास उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. रात्रीच्या जडवाहने उभी करणारे वाहनचालक मद्य प्राशन करुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याने बजाजनगरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. एमआयडीसीसह पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. रहदारीस अडथळा ठरणारी नागरी वसाहतीतील गोदामे औद्योगिक परिसरात स्थालांतरित करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे.

अपघाताचा धोका वाढलारस्त्यालगत उभा राहणा-या या अवजड वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, अपघाताचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. या अनधिकृत गोदामाकडे एमआयडीसी प्रशासनही डोळेझाक करीत असल्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. वाहतुकीची कोंडी करणाºया जडवाहनधारकाविरुध्द वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचारीही कारवाई करण्यास धजावत नसल्यामुळे नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :WalujवाळूजTrafficवाहतूक कोंडी