शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

महसूलला डावलल्याने नागरी सेवा पुरस्कार वादात

By admin | Updated: April 23, 2016 01:21 IST

औरंगाबाद : १० व्या नागरी सेवा दिनानिमित्त देण्यात आलेल्या पुरस्कारात महसूल विभागाला डावलल्यामुळे ते पुरस्कार वादात अडकले आहेत.

औरंगाबाद : १० व्या नागरी सेवा दिनानिमित्त देण्यात आलेल्या पुरस्कारात महसूल विभागाला डावलल्यामुळे ते पुरस्कार वादात अडकले आहेत. पुरस्काराची यादी पाहिली असता यामध्ये क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे, अशी तक्रार राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा समजला जातो. ज्यावेळी शासनाचे अतिमहत्त्वाचे विषय मार्गी लावणे अथवा कार्यान्वित करायचे असतात. तेव्हा महसूल विभागावरच ती जबाबदारी दिली जाते. कितीही कामाचा व्याप असला तरी तो विभागच कामे पूर्ण करतो. असे असताना पुरस्कार देताना किंवा वेतनश्रेणी देण्याचा विषय आला की महसूल विभागाचा शासनाला सोयिस्कररीत्या विसर पडतो. महसूल विभागात केवळ जिल्हाधिकारीच काम करतात व इतर पदांवरील अधिकारी, कर्मचारी जसे अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, कनिष्ठ लिपिक, शिपाई, वाहनचालक, कोतवाल हे कोणीच काम करीत नाहीत, असा शासनाचा समज झाला आहे. दुष्काळात हीच यंत्रणा काम करीत आहे. शासनाला याचा विसर पडल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महसूल विभागच खऱ्या अर्थाने नागरी सेवा विभाग आहे; परंतु नागरी सेवा दिनाच्या सत्कारातून या विभागालाच डावलल्याने संघटनेच्या भावना तीव्र झाल्या आहेत, असे संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी पत्रात म्हटले आहे. जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे यांनी १० व्या नागरी सेवा दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, तहसीलदार शशिकांत गायकवाड, नायब तहसीलदार बी. डी. म्हस्के, मंडळ अधिकारी सतीश तुपे, अव्वल कारकून सचिन सपकाळे, तलाठी उदय कुलकर्णी, लिपिक आर. के. जरे, लघुलेखक डी. एल. आटुळे, लघुटंकलेखक दीपक आगळे, वाहनचालक गोरख डोंगरे, शिपाई फकीरचंद डोंगरे, कोतवाल राजेंद्र सुरासे यांना नागरी सेवा पुरस्कार प्रदान केला. नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासनाचे विविध विभाग जिल्हास्तरावर जनतेची कामे करण्यासाठी तयार असतात. आधुनिक तंत्रज्ञान आता लोकविकासाचे साधन बनले आहे. कुणावरही टीका-टिप्पणी न करता आपले कर्तव्य चोख बजवावे. लोकांप्रती समर्पण असावे. शिस्तप्रियता असावी, तणावमुक्त काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पांडे यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची यावेळी उपस्थिती होती.