शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील विडी उद्योग संकटात..!

By admin | Updated: July 2, 2017 00:38 IST

जालना : जीएसटी कर प्रणालीत विडी उद्योगावर २८ टक्के कर लागणार असल्याने या उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जीएसटी कर प्रणालीत विडी उद्योगावर २८ टक्के कर लागणार असल्याने या उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कच्चा मालासाठी भरण्यात येणाऱ्या करावर परतावा मिळणार की नाही याबाबत संभ्रमावस्था असल्याने स्थानिक विडी उद्योगांनी शनिवारी कारखाने बंद ठेवले.जालना शहरात विडी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुमारे दोन हजार कामगार वेगवेगळ्या विडी कारखान्यात काम करतात. देशात एक जुलैपासून जीएसटी कर प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार विडी बनविण्यासाठी लागणाऱ्या तंबाखूवर २८ टक्के, तेंदू पत्त्यावर १८ टक्के, विडी बांधण्यासाठी लागणाऱ्या धाग्यावर पाच टक्के, तसेच पॅकिंग, रॅपर, लेबल, बॉक्स यावर १२ टक्के जीएसटी लागणार आहे. याचा मोठा फटका जालन्यातील मजूर, नांगर व गायछाप विडी उद्योगाला बसणार आहे. शिवाय तयार मालापासून विडी विक्रीपर्यंतच्या सर्वच पातळ्यांवर जीएसटी लागणार असल्याने विडी उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तयार माल नवीन दराने विक्री करायचा की, जुन्या या गोंधळामुळे स्थानिक विडी उद्योजकांनी विक्रीही बंद ठेवली आहे. शहरातील विडी उद्योजकांनी उत्पादन बंद ठेवल्याने हाताने विडी बनविणाऱ्या महिलांसह कारखान्यातील कामगारांच्या हाताला शनिवारी काम मिळाले नाही. आणखी आठवडाभरच अशीच परिस्थिती राहणार असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.