शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ५४ पथक करणार कोरोना तपासण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:02 IST

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेची सर्व यंत्रणा झोकून कामाला लागली आहे. शहरात मार्च ...

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेची सर्व यंत्रणा झोकून कामाला लागली आहे. शहरात मार्च महिन्यापासून रुग्णांची संख्या खूपच गतीने वाढते आहे. मंगळवारी शहरात १ हजार ११ रुग्ण निघाले. त्यामुळे अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्यासाठी पथक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्वीपासून १० मोबाइल टीम आणि २४ तपासणी केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. त्यातच आता आणखी ६ मोबाइल टीम, कंटेनमेंट झोनसाठी ६ टीम आणि शहराच्या एन्ट्री पॉईंटवर सहा ठिकाणी ६ टीम तपासण्या करणार आहेत. वाढत्या रुग्णांसाठी बेडस् व सेवा उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजनही प्रशासन करत आहे.

कन्टेनमेंट झोनच्या निकषांत बदल

आता २० पेक्षा अधिक रुग्ण आढल्यास संबंधित वसाहत पत्र्यांनी सील केली जाणार नाही, तर त्या ठिकाणी पोस्टर्स व बॅनर लाऊन ही वसाहत कन्टेनमेंट झोन असल्याचे जाहीर केले जाईल. त्या भागातीलच एका व्यक्‍तीस स्वयंसेवक म्हणून देखरेखीसाठी नियुक्‍त केले जाईल. संबंधित भागातील पालिकेच्या आशासेविका, शिक्षकांकडून रोज तेथे पाहणी करतील तसेच कोरोना चाचण्यांसाठी नोडल ऑफिसर म्हणूनही ते काम करतील. रोजचा पाहणी अहवाल ते वॉररूमला देतील. यासाठी वॉररूममध्ये मनुष्यबळ वाढवले जात आहे.

रुग्णांच्या वाहतुकीसाठी २० बस

चाचण्यांतून पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना रूग्णांच्या वाहतुकीसाठी व पथकांसाठी २० स्मार्ट बस घेतल्या आहेत. सोबतच सध्या दोन मनपाच्या अ‍ॅम्ब्युलन्स व चार भाडेतत्वावर सुरू असून त्यात आणखी १० नवीन अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार आहेत.