शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहर निघाले जागतिक वारसा स्थळांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:47 IST

डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक वास्तू स्थळांभोवती असलेले सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा. युनेस्कोद्वारे ते मानांकन शहराला मिळावे. यासाठी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत सोमवारी प्राथमिक आढावा बैठक झाली. बैठकीअंती डिसेंबरपर्यंत ऐतिहासिक वास्तू स्थळांभोवती असलेले सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले.शहराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवरूनच येथील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि विकासाला निधी उपलब्ध होईल. शिवाय शहराचा पर्यटन निर्देशांक वाढेल.विभागीय आयुक्त डॉ.भापकर म्हणाले, जागतिक वारसा स्थळांत औरंगाबाद शहराचा समावेश व्हावा, यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्याच्या अनुषंगाने प्राथमिक चर्चा केली. मनपा हद्दीमध्ये बीबीका मकबरा, औरंगाबाद लेण्यांचा समावेश आहे. १४२ ऐतिहासिक स्थळे शहरात आहेत. १२ ठिकाणे राज्य पुरातत्व विभागाकडे आहेत. तर काही ठिकाणे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे आहेत.ऐतिहासिक स्थळांलगत असलेली अतिक्रमणे, स्मार्ट सिटीचा होणारा फायदा, संवर्धनासाठी असलेले बजेट, ऐतिहासिक वास्तूंची सद्य:स्थिती काय आहे. देखभाल कोण व कशी करीत आहे. येथील सांस्कृतिक मूल्ये कशी आहेत. जीवनशैली, इतिहासातील महत्त्व याचा अहवाल युनेस्कोकडे पाठविण्यासाठी चांगल्या प्रेझेंटेशनची तयारी करावी लागणार आहे. अतिक्रमणमुक्त ऐतिहासिक वास्तू असल्याचे अहवालात नमूद करावे लागेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समिती शहरात पाहणी करील. समितीने समाधानकारक अहवाल दिला तर शहर जयपूरप्रमाणे ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा होईल. जयपूरचा अहवाल तीन दशकांत सहा वेळा गेला, तेव्हा कुठे यावर्षी त्या शहराला ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले. सोमवारी प्राथमिक चर्चा केली असून, सर्व ऐतिहासिक वास्तूंची यादी पालिका १ नोव्हेंबरपर्यंत देणार आहे. त्यानंतर पुढील कामाला वेग येईल.