शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८६, रिकव्हरी रेट ९६.२८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३४ वरून आता थेट ३.८६पर्यंत तर रिकव्हरी ...

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३४ वरून आता थेट ३.८६पर्यंत तर रिकव्हरी रेट ९६.२८ टक्के एवढा मंगळवारी नोंदविण्यात आला. १ जूनपासून राज्य शासन निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी आणि रिकव्हरी रेटचे आकडे यासाठी सहायक ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संक्रमण निश्चित कमी झाले असले तरी धोका अद्याप टळलेला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लसीकरण, लॉकडाऊन आदी कारणांमुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरात १०० नागरिकांची तपासणी केली, तर त्यातील ३४ जण पॉझिटिव्ह येत होते. संक्रमणाचे हे आकडे आरोग्य आणि शासकीय यंत्रणेला थक्क करणारे होते. आता शंभर नागरिकांची तपासणी केली तर फक्त चारजण बाधित आढळून येत आहेत. बाधित आढळून आलेल्यांमध्ये बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९६ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक नुकसान म्हणजे जीवितहानीचे झालेले आहे. काही दिवसांपासून सुरू असलेले मृत्युसत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. शहरात दररोज किमान दहा, तर जिल्ह्यात १७ ते २४ रुग्णांचा मृत्यू होत आहे. विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसह आता ३० ते ३५ वयोगटांतील तरुणही मृत्युमुखी पडत आहेत. मागील महिन्यात कोरोना संशयित म्हणून मरण पावलेल्या रुग्णांची संख्या तब्बल १७०० होती. सध्याही कोरोना आणि संशयितांचा आकडा प्रचंड वाढलेला आहे. मात्र शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.