शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्ष लागले कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:40 IST

नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले असून नऊ प्रभागांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे १८ सदस्य निवडले जाणार आहेत़ तर नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले असून नऊ प्रभागांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे १८ सदस्य निवडले जाणार आहेत़ तर नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे़‘क’ वर्गात असलेल्या किनवट नगर परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष आघाडीची सत्ता आहे़ नगर परिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, काँग्रेसचे ४, शिवसेना ४ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे़नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीनंतर किनवट नगर परिषदेची निवडणूक होत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे़ २०१२ च्या निवडणुकीत भाजपाला खातेही उघडता आले नाही़ ही परिस्थिती लक्षात घेवून भाजपाने निवडणूक रणनीती आखली आहे़ नगर परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता यावी, यासाठी भाजपाच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत़ निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा व शिवसेना हे पक्ष प्रबळ राहणार आहेत़ राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात आघाडी तसेच भाजपा - सेनेची युती झाल्यास खरी रंगत येणार आहे़किनवट विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रदीप नाईक हे सलग तिसºयांदा निवडून आले आहेत़ या निवडणुकीत ते लक्ष केंद्रित करणार आहेत़माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण व आ़ प्रदीप नाईक यांनी आघाडी करून निवडणूक लढवली तर ही नगरपालिका आघाडीच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे़ कारण शिवसेना व भाजपात मधुर संबंध राहिले नसल्याने आघाडीला याचा लाभ मिळणार आहे़ निवडणुकीत माकप, भाकप, भारिप, बसपा, मनसे, एमआयएम, पिरीपा, आरपीआय हे पक्ष तिसरी आघाडी करून रिंगणात उतरतील़ माजी आ़ भीमराव केराम हे या निवडणुकीत काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे़