शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पीपीपी मॉडेलवर शहर बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2016 01:22 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत पीपीपी मॅडेलवर शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत पीपीपी मॅडेलवर शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. औरंगाबादकरांना स्मार्ट सिटीचे फायदे कसे दिसून येतील अशा कामांना प्राधान्य देण्यात येईल. स्मार्ट सिटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्हीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.केंद्र शासनाने मागील महिन्यातच औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड केली आहे. यानंतर एसपीव्हीची स्थापना करण्यात आली. एसपीव्हीचे मेन्टॉर तथा संचालक अपूर्व चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. ऐनवेळी अपूर्व चंद्र बैठकीस हजर राहू शकले नाहीत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, फोट्रेस कंपनीचे अजय भोरे आदींची उपस्थिती होती.एसपीव्हीच्या बैठकीत विविध विकासकामांच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. पॅन सिटीमध्ये जुन्या शहराला जास्तीत जास्त फायदा मिळेल अशा दोनच गोष्टी आहेत. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि घनकचरा या दोनच मुद्यांचा समावेश आहे. शहरात पीपीपी मॉडेलवर एसपीव्हीअंतर्गत बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आला. सेफ सिटीअंतर्गत प्रत्येक चौकात सीसीटीव्ही, शहरातील प्रत्येक चौकांचे सुशोभीकरण करावे, प्रत्येक चौकात झेब्रा क्रॉसिंग असावे, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. एसपीव्हीचे संचालक अपूर्व चंद्र यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरही बोलू शकले नाहीत.\अत्याधुनिक बससेवाशहराला सार्वजनिक बसेसची खूप गरज आहे. मोठ्या अंतरासाठी मोठ्या बसेस ठेवण्याचा विचार आहे. जुन्या शहरासाठी चांगल्या आकर्षक अशा लहान बसेस ठेवण्यात येतील. बसस्टॉप अत्यंत आधुनिक असतील. पर्यटकांसाठी औरंगाबाद दर्शन या स्वतंत्र बसचाही समावेश असेल.