शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शहर अस्वच्छतेचे खापर उन्हाळेंच्या माथ्यावर

By admin | Updated: June 15, 2017 00:16 IST

नांदेड : शहरातील अस्वच्छतेच्या परिस्थितीस तत्कालीन आयुक्त समीर उन्हाळे हेच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील अस्वच्छतेच्या परिस्थितीस तत्कालीन आयुक्त समीर उन्हाळे हेच जबाबदार असल्याचा ठपका बुधवारी महापालिकेत झालेल्या शहर स्वच्छतेच्या आढाव्यात ठेवण्यात आला.शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेत महापौर शैलजा स्वामी यांनी बैठक घेतली. या बैठकीस नगरसेवकांनाही बोलावण्यात आले होते. तत्कालीन शहर स्वच्छता कंत्राटदार ए टू झेडने महिनापूर्वीच मार्चअखेर आपले काम पूर्ण होत असून आपण काम थांबवणार असल्याची सूचना मनपा प्रशासनास दिली होती. मात्र शहर स्वच्छतेची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर कंत्राटदाराचे काम चालू ठेवणे आवश्यक होते. मात्र असे न करता तत्कालीन आयुक्तांनी एटूझेडला कार्यमुक्त केले. त्यामुळेच आज ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे संपूर्ण शहराचे आरोग्य वेठीस धरले आहे. याबाबत महापौर स्वामी यांनी तत्कालीन आयुक्त उन्हाळे यांची मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. येत्या दोन दिवसांत शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे नूतन आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले. उपस्थित नगरसेवकांनी मनपा प्रशासनामुळे आम्हाला प्रभागात निघणेही अवघड झाल्याचे सांगितले. बैठकीस सभापती मंगला देशमुख, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, अनुजा तेहरा, विजय येवनकर, संजय मोरे, सतीश राखेवार, डॉ. करुणा जमदाडे, किशोर यादव, शेर अली, बावजीर, किशोर भवरे, उमेश चव्हाण आदींची उपस्थिती होती.