शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जनतेची पाण्यासाठी भटकंती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:21 IST

शहरातील अनेक वसाहतींमध्ये सोमवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणीच मिळाले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतींमध्ये सोमवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणीच मिळाले नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागला. पिण्यासाठीही अनेक घरांमध्ये पाणी नसल्याने २० ते ३० रुपये खर्च करून पाण्याचे जार आणावे लागले. पाणी कधी येईल, याची माहिती मनपा अधिकारी व कर्मचा-यांकडून देण्यात येत नव्हती. नागरिकांनी लोकप्रतिनिधींना पाण्यासाठी भंडावून सोडले होते.नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, पुंडलिकनगर, सिडको एन-२, बेगमपुरा परिसर, हनुमान टेकडी, विद्युत कॉलनी, स्वामी विवेकानंदनगर हडको, म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर, जाधववाडी, बुढीलेन, लोटाकारंजा, शहागंज आदी कितीतरी वसाहतींमध्ये सोमवारी पाणी आले नाही. मागील चार ते पाच दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना सोमवारी कामकाजाच्या दिवशी पाण्यासाठी भटकंती करावी लागली. अनेक मोठ्या सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये खाजगी पाण्याचे टँकर पाणी देत असल्याचे दिसून आले. जाधववाडी भागात तर पावसाचे पाणी छतावरून खाली कोसळत असताना नागरिकांनी ड्रम लावून भरून घेतले. धुणी, भांडी आदी वापरासाठी पाणी कामाला येईल, असेही काही नागरिकांनी सांगितले.दूषित पाण्याच्या तक्रारीरामनगर, सिंहगड कॉलनी आदी वसाहतींमध्ये दूषित पाणी आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात आले त्यांच्या पाण्यात क्लोरिनचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते. पाण्यात क्लोरिनचा प्रचंड वास येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.पर्यायी व्यवस्थाच नाहीमहापालिकेने खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमाने टँकरची व्यवस्था मजबूत केली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून ज्या वसाहतींना पाणी मिळाले नाही, त्यांना टँकरद्वारेही पाणी देण्याची तसदी मनपा प्रशासनाने घेतली नाही.तक्रारींचा महापूरमहापौर बापू घडमोडे यांनी सांगितले की, शहरात पाणी आले नाही, म्हणून प्रचंड तक्रारी आहेत. असंख्य नागरिक पाणी आले नाही, तरीही सहन करीत आहेत. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर येऊन संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला. प्रशासनाने युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करायला हवा.