शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

निर्णयाच्या बदलास नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:10 IST

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच पूर्वीच्या निर्णयात बदल करीत दारू विक्रीच्या दुकानांना नगरपालिका, महापालिकेच्या हद्दीत मंजुरी दिली आहे़ हा निर्णय योग्य नसल्याचे मत परभणीत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले असून, न्यायालयाने पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी विनंती देखील काही नागरिकांनी केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच पूर्वीच्या निर्णयात बदल करीत दारू विक्रीच्या दुकानांना नगरपालिका, महापालिकेच्या हद्दीत मंजुरी दिली आहे़ हा निर्णय योग्य नसल्याचे मत परभणीत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले असून, न्यायालयाने पुन्हा एकदा फेरविचार करावा, अशी विनंती देखील काही नागरिकांनी केली आहे़राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर ५०० मीटरच्या अंतरात दारु विक्रीची दुकाने चालविण्यास बंदी घालण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता़ या निर्णयामुळे अनेकांची अडचण झाली़ छुप्या पद्धतीने शहरी भागात दारु दुकाने थाटली जावू लागली़ दरम्यान, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने याच संदर्भात आणखी एक निर्णय देत नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून जाणाºया राज्य, राष्ट्रीय महामार्गावर दारू दुकान सुरू करण्यास मान्यता दिली आहे़ न्यायालयाच्या या निर्णयानंतर परभणीत नागरिकांचे सर्व्हेक्षण केले़ तेव्हा अनेक नागरिकांनी निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले़दारु दुकानासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने निर्णयात केलेला बदल योग्य वाटतो का? या प्रश्नावर ७२ टक्के नागरिकांनी नाही, असे उत्तर दिले आहे़ २२ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर ६ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे़ नगरपालिका, मनपा हद्दीत मुख्य मार्गावर दारु विक्रीची दुकाने सुरू झाल्यास अपघातांची संख्या वाढेल का? या प्रश्नावर ७६ टक्के नागरिकांनी अपघात वाढतील, असे म्हटले आहे़ १० टक्के नागरिकांनी नाही, असे म्हटले तर १४ टक्के नागरिकांनी कोणतेही उत्तर दिले नाही़सर्वोच्च न्यायालयाच्या दुसºया निर्णयाविषयी आश्चर्य तर व्यक्त होतच आहे़ शिवाय या निर्णयासंदर्भात फेरविचार व्हावा, अशी विनंती देखील केली जात आहे़ हा निर्णय दबावाखाली घेतला असावा, अशी शंका निर्माण होऊ शकते़ त्यामुळे याच अनुषंगाने दबावाखाली येवून न्यायालयाने निर्णय घेतला असेल का? असा प्रश्न केला तेव्हा नागरिकांनी तोलून मापून उत्तर दिले आहे़ ३६ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर ३६ टक्केच नागरिकांनी नाही म्हटले़ २८ टक्के नागरिकांनी मात्र कोणतेही उत्तर दिले नाही़ त्यामुळे न्यायालयाचा निर्णय पटला नसला तरी नागरिकांनी न्यायालयावर देखील आपला तेवढाच विश्वास असल्याचे या सर्वेक्षणातून नमूद केले आहे़ राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर दारुची दुकाने असल्यानेच अपघातांमध्ये वाढ होत आहे़ ही दुकाने या ठिकाणाहून हटविली तर अपघात कमी होतील, या हेतूने सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचा निर्णय घेतला होता़ हा निर्णय योग्य होता़ परंतु, त्यानंतर शहरी भागात राज्य, राष्ट्रीय महामार्गावर दारू दुकान सुरू करण्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे़ त्यामुळे शहरी भागात अपघात वाढणार नाहीत का, असा प्रश्न निर्माण होत आहे.