शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

टेस्टिंगसाठी नागरिक येईना, लसीकरणासाठी शासन व्हायल देईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:04 IST

रऊफ शेख फुलंब्री : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित नागरिकांचा आकडा हजारावर गेला. आता यात टेस्टिंग करण्यासाठी स्वत:हून नागरिक ...

रऊफ शेख

फुलंब्री : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित नागरिकांचा आकडा हजारावर गेला. आता यात टेस्टिंग करण्यासाठी स्वत:हून नागरिक समोर येत नसल्याचे दिसून येत आहे, तर लसीकरण करण्यासाठी शासनाकडून ‘व्हायल’चा पुरवठा सुरळीत होईना, अशी

भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेला आरोग्य विभाग कसे रोखू शकणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

फुलंब्री तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. १ मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या पहिल्या लाटेत ५४७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर दुसरी लाट अत्यंत वेगाने आली. यात १ फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल या तीन महिन्यांच्या काळातच ९०५, तर १० मे पर्यंत १०२२ कोरोनाबाधित रुग्ण निघाले. आता संभाव्य असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असले तरी त्यांना नागरिकांकडून सहकार्य मिळेल की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात शासनाकडून प्रत्येक ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी आवश्यक लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेलाच हरताळ फासला गेला आहे.

------

फुलंब्री तालुक्यातील परिस्थिती

कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या : १५६९

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण : १५९

विलगीकरणमधील रुग्ण : ९६

फुलंब्री शहरातील रुग्णसंख्या : १५

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या : १४४

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण : १४.७

----------

आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

पहिला डोस : ८८८

दुसरा डोस : ४०९

फ्रंटलाइन वर्कर

पहिला डोस : १२५७

दुसरा डोस : ४५३

४५ ते ५९ वयोगटातील लसीकरण

पहिला डोस : ४९५४

दुसरा डोस : १६९

६० वयावरील :

पहिला डोस : ५३१८

दुसरा डोस : १५९

१८ ते ४४ वयोगट : १७३

-------

कोरोना टेस्टिंग : पॉझिटिव्ह संख्या

१ एप्रिलपर्यंत : १०,१७८

१ ते १० एप्रिल : १९१५

१० ते २० एप्रिल : २०१८

२० ते ३० एप्रिल : २६४८

३० एप्रिल ते ८ मे : २२४२

---

पॉइंट :

१) लोकसंख्येच्या मानाने टेस्टिंगचे प्रमाण नगण्य : फुलंब्री तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६१ हजार आहे. या संख्येच्या तुलनेत आतापर्यंत १९ हजार लोकांची टेस्टिंग करण्यात आली आहे. आरोग्य विभाग असो अथवा स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने टेस्टिंग, लसीकरणासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे; पण यासाठी नागरिकांकडून सहकार्य मिळताना दिसत नाही. टेस्टिंग म्हटले की नागरिक पुढे यायला तयार होत नाहीत.

२) गैरसमज दूर झाला; पण लस मिळेना : तालुक्यातील नागरिक सुरुवातीला लसीकरण करण्याला धजत नव्हते; पण आता लसीकरणाबाबत गैरसमज दूर झाल्याने लस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी करू लागले आहेत. आतापर्यंत १३,५९७ जणांचे लसीकरण झाले आहे; पण आता काही दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरणाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. लस मिळेल का लस, अशी म्हणण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.

३) कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण १४ टक्क्यांवर : फुलंब्री तालुक्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण १४.७ टक्क्यांवर आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १४ लोकांची तपासणी केली जाते. एखाद्या गावात पॉझिटिव्हची संख्या वाढल्याचे आढळून आले. अशा ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्त जोर दिला जातो.

कोट :

फुलंब्री तालुक्यात लॉकडाऊन काळातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत बरीच घट आली. नागरिक टेस्टिंगसाठी पुढाकार घेण्यास तयार नाही, तर लसीकरण करण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे; पण सध्या लस कमी प्रमाण उपलब्ध होत आहे. टेस्टिंग व लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाचे काम सुरू आहे. - डॉ. प्रसन्ना भाले, तालुका आरोग्य अधिकारी.