शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र चोरट्यास नागरिकांनी पकडले

By admin | Updated: June 14, 2017 00:38 IST

वाळूज महानगर : बजाजनगर परिसरात सोमवारी (दि.१३) रात्री दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीवरून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वार भामट्यास नागरिकांनी पाठलाग करून वडगावात पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : बजाजनगर परिसरात सोमवारी (दि.१३) रात्री दोन महिलांचे मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीवरून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वार भामट्यास नागरिकांनी पाठलाग करून वडगावात पकडले. संतप्त नागरिकांनी भामट्यास बेदम चोप देऊन एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले.लता सुपडू वराडे (३५) व त्यांच्या शेजारीण भारती धंडारे (रा. शिवालय चौक, बजाजनगर) या दोघी सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शतपावली करीत होत्या. त्रिमूर्ती शाळेसमोरून जात असताना गुलाबी रंगाचा शर्ट व गळ्यात भगवा रुमाल असलेला एक दुचाकीस्वार तरुण महिलांच्या पाठीमागून पुढे गेला. थोडे अंतर पुढे जाऊन त्याने तात्काळ यू-टर्न घेतला व मागे आला. लता वराडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून इंद्रप्रस्थ कॉलनीकडे भरधाव निघून गेला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लता वराडे व भारती धंडारे यांनी आरडाओरड केल्याने वाटसरू जमा झाले. ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण भोळे यांनी या घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना देऊन काही तरुणांसह या भामट्याचा पाठलाग सुरूकेला. मंगळसूत्र लांबविलेलता वराडे यांचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार भामटा इंद्रप्रस्थ कॉलनीच्या दिशेने गेला. रात्री १० वाजेच्या सुमारास सुलोचना खैरनार (३८, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी) या पतीसह अल्फोन्सा शाळेकडून स्टरलाईट कंपनीकडे शतपावली करीत जात असताना एक दुचाकीस्वार समोरून पाठीमागे गेला. काही क्षणांतच त्याने पुन्हा यू-टर्न मारत सुलोचना खैरनार यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका देऊन तोडले व धूम ठोकली. खैरनार पती-पत्नीने आरडा-ओरड केल्याने काही दुचाकीस्वारांनी त्या भामट्याचा पाठलाग सुरू केला.चोरट्याला कट मारणे महागात पडलेदोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्यानंतर या भामट्याने इंद्रप्रस्थ कॉलनीतून भरधाव जाताना दुचाकीस्वार गजानन नावाच्या तरुणास कट मारला. त्यामुळे गजाननने त्याचा पाठलाग सुरू केला. हा पाठशिवणीचा खेळ सुरू असताना त्या भामट्याच्या दुचाकीचे पेट्रोल वडगावात संपले. दुचाकी उभी करून पळून जाण्याच्या तयारीत असताना गजाननने त्यास पकडून चोप दिला. ही हाणामारी सुरू असताना पाठलाग करणारे अन्य तरुण व दुचाकीस्वार तेथे पोहोचले. हाच तो मंगळसूत्र चोरटा असल्याचे लक्षात येताच संतप्त जमावाने त्यास बेदम मारहाण केली.